'सचिन -अ बिलियन ड्रीम्स'मध्ये मयुरेश बनला सचिनचा भाऊ !

'सचिन -अ बिलियन ड्रीम्स'मध्ये मयुरेश बनला सचिनचा भाऊ !

'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे

  • Share this:

नीलिमा कुलकर्णी, मुंबई

13 एप्रिल : 'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे. ऑल द बेस्ट 2 या नाटकाच्या प्रयोगाला या सिनेमाचे दिग्दर्शक जेम्स अर्स्किन उपस्थित होते. तेव्हा त्यांनी मयुरेशचं काम पाहून त्याची निवड या सिनेमासाठी केली.

अनेक वर्कशाॅप्स आणि अभिनयाचे नवे धडे यानिमित्ताने मयुरेशला शिकता आले. दिग्दर्शक हाॅलिवूडचे असल्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत आणि तंत्र निराळं होतं. या अनुभवाची शिदोरी यापुढेही कायम उपयोगी पडेल असं मयुरेश सांगतो. या सिनेमात काम करताना सचिन तेंडुलकर आणि ए.आर.रहमान या दोन लिव्हिंग लेजण्ड्सना भेटता आलं.

सचिनची शिस्त आणि साधेपणा अत्यंत प्रेरणा देऊन जातो हे सांगताना मयुरेश हळवा झाला. आपल्याला क्रिकेटची आवड नसली तरी घरी क्रिकेटप्रेमी बाबा आणि आजोबा असल्यामुळे या सिनेमामुळे मी नकळतपणे त्यांचं स्वप्न पूर्ण केलं असं मयुरेश सांगतो. हा सिनेमा डाॅक्यु-फिचर या प्रकारात मोडतो.

त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या मॅचेस या जशाच्या तशा पाहता येतील तर त्याचा कुटुंबियांसोबतचा भाग फिक्शन असेल ज्यात सचिन स्वतःचीच भूमिका साकारताना मोठ्या पडद्यावर दिसेल. यामुळे सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांना त्याच्या अभिनयाची झलक देखील पाहता येईल. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा हा जीवनपट सिनेमागृहात पाहण्यासाठी 26 मेपर्यंत वाट पहावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...