मुंबई 12 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांना सध्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. (Manoj Bajpayee has tested positive) माझी तब्येत स्थिर कोणीही काळजी करु नये अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे. शिवाय कोरोनापासून सावध राहा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या. असा सल्ला त्यानं चाहत्यांना दिला आहे.
Actor #ManojBajpayee has tested positive for #COVID19 & is in self-#quarantine at his home, his team releases a statement. @BajpayeeManoj pic.twitter.com/FNeYLbQ7FJ
— The Pioneer (@TheDailyPioneer) March 12, 2021
महाराष्ट्रातील कोरोनास्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.
महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असली तरी, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात या तीन राज्यांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होण्याची भीती पॉल यांनी व्यक्त केली. दिल्ली सरकारनेही सावध राहण्याची गरज आहे. या राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी तीन बैठका झाल्या असून प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे सक्त आदेश केंद्राने दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus, Covid-19 positive, Manoj Bajpayee