मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेते महेश कोठारेंना पितृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचं निधन

अभिनेते महेश कोठारेंना पितृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचं निधन

महेश कोठारेंच्या वडिलांचं निधन

महेश कोठारेंच्या वडिलांचं निधन

नातसून अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आजे सासऱ्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अंबर कोठारे यांनी 'दे दणादण' या सिनेमातही त्यांनी खलनायकाची भूमिका उत्तमरित्या वठवली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  21 जानेवारी :  मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं अंबर कोठारे यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची नातसून अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आजे सासऱ्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अंबर कोठारे यांच्यावर बोरिवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश कोठारे यांच्या संपूर्ण प्रवासात वडील अंबर कोठारे यांचा मोलाचा वाटा होता. अनेक सिनेमा, नाटकात त्यांनी कामं केली आहेत.  'धुमधडाका' हा त्यांनी त्यांनी निर्मिती केलेला सिनेमा प्रचंड गाजला. त्याचप्रमाणे 'दे दणादण' या सिनेमातही त्यांनी खलनायकाची भूमिका उत्तमरित्या वठवली होती. त्यांच्या निधनानं कोठारे फॅमिली दु:खात आहे. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळींकडून अंबर कोठारे यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. त्यांचं बालपण कष्टात गेलं. घरची परिस्थिती नसल्यानं त्यांनी कमी वयात अनेक लहान मोठी काम केली. त्यांचं बालपण हे गिरगावात गेलं. एकेकाळी त्यांनी गिरगावातील रस्त्यांवर उटणं विकण्याचं कामही केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ब्रिटिश बँक ऑफ दि मिड इस्ट बँकेत नोकरी मिळाली. चार दशकं त्यांनी बँकेत काम केलं.

हेही वाचा - Mahesh Kothare Autobiography: 'डॅम इट'ला मिळाला हक्काचा कॉपी राईट; महेश कोठारेंचं आत्मचरित्र्य प्रकाशित

अंबर कोठारे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. पण नोकरी करत करत त्यांनी त्यांच्या अभिनयाची आवडही जोपासली. प्रयोगिक रंगभूमीवर त्यांनी अनेक वर्ष कामं केली. आयएनटी म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरच्या मराठी विभागाचे ते सचिव होते. या संस्थेद्वारे त्यांनी अनेक नाटकं सादर केली. त्यातील झोपी गेलेला जागा झाला हे नाटक सर्वांच्या लक्षात राहिलं. आज सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या अनेक कलाकारांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात या नाटकाच काम केलं. या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले होते.

झुंजारराव नाटकात अंबर कोठारे यांनी अभिनय केला होता. त्यांची भूमिका विशेष पसंतीस पडली.  त्यानंतर मुलगा महेश कोठारे याला देखील त्यांनी अभिनय क्षेत्रात आणलं. महेश कोठारे यांना घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे आपसूकच त्यांची ओढ देखील सिनेसृष्टीशी होती.  धुमधडाका हा त्यांची निर्मिती आणि महेश कोठारे यांचं दिग्दर्शक असलेला सिनेमा खूप गाजला. त्यानंतर दे दणादण सिनेमात त्यांनी काम केलं. भूमिका छोटी असली ती कायम प्रेक्षकांच्या लक्षात पाहिली.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news