Home /News /entertainment /

सांगायला शब्द का पाहिजे? ललितला पडलाय प्रश्न; अभिनेत्याच्या नव्या पोस्टची चर्चा

सांगायला शब्द का पाहिजे? ललितला पडलाय प्रश्न; अभिनेत्याच्या नव्या पोस्टची चर्चा

ललित सोशल मीडियावर त्याचे भन्नाट फोटो तर शेअर करत असतोच मात्र ललितला गाणी, कविता हा प्रकारही आवडतो. ललितला स्वत:ला शायरी, गाणी, कविता लिहिण्याचा छंद आहे.

  मुंबई, 06 जुलै: रेशीमगाठी ( Reshimgathi Serial)  म्हणत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) आजही प्रेक्षकांचा लाडका अभिनेता आहे. टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात ललितनं उत्तम काम केलं आहे आणि त्यात आजही तो सक्रीय आहे. मराठीत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ललित प्रभाकरचं नाव आहे. ललित सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. ललितनं नुकताच त्याचा एक सॅड फोटो शेअर केला आहे. त्याखाली त्यानं 'या शांत डोळी उदासी कशी,  सांगायला शब्द का पाहिजे?' म्हणत एक काही गाण्याच्या ओळी शेअर केल्यात. त्याचा या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ललितला नेमका कसला प्रश्न पडलाय, असं सर्वांना वाटलं असेल. ललित सोशल मीडियावर  त्याचे भन्नाट फोटो तर शेअर करत असतोच मात्र ललितला गाणी, कविता हा प्रकारही आवडतो. ललितला स्वत:ला शायरी, गाणी, कविता लिहिण्याचा छंद आहे. त्यामुळे ललित सोशल मीडियावर बऱ्याचदा कविता शायरी शेअर करताना दिसतो.  यावेळी ललितनं 'या शांत डोळी उदासी कशी दुःखास का गोड हे. आले हसू, आले हसू… बोलायला बोल का पाहिजे सांगायला शब्द का पाहिजे..', या गाण्याच्या ओळी शेअर केल्या आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by @lalit.prabhakar

  हेही वाचा - हम तो ऐसेच है भैया! सुनिल बर्वेनं मारला वडापाव, मिरची अन् गरमागरम भज्यांवर ताव ललितचा नुकताच मीडियम स्पायसी (medium spicy film )  हा सिनेमा प्रदर्शित झाला. ललितनं शेअर केलेल्या या ओळी त्याच सिनेमातील आहे. 'का पाहिजे' या सुंदर गाण्याच्या त्या ओळी आहेत. अभिनेता आणि कवी जितेंद्र जोशी यानं हे गाणं लिहिलं आहे. त्यानं लिहिलेल्या या सुंदर गाण्याच्या ओळी सर्वांनाच आवडल्यात. सिनेमात हे गाणं गायक जसराज जोशी यानं गायलं आहे तर ललित प्रभाकर, सई ताम्हणकर यांच्यावर हे गाणं शुट करण्यात आलं आहे. मुंबईच्या वांद्रे येथील सुंदर गल्ल्यांमध्ये गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मीडियम स्पायसी या सिनेमाच्या शेवटी हे गाणं प्रेक्षकांच्या पाहायला मिळत. ललितसाठी हे गाणं फार जवळचं आणि आवडीचं आहे.  ललितनं शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका युझरनं म्हटलंय, 'बोलायला शब्द नको फक्त दोन बोलके डोळे हवेत अगदी तुझ्या सारखेच'. तर दुसऱ्या युझरनं,  'निस्सीम प्रेम, निर्मळ प्रेम' असं म्हणत ललितच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केलाय.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या