Home /News /entertainment /

अभिनेते कुमुद मिश्रा COVID-19 पॉझिटिव्ह, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

अभिनेते कुमुद मिश्रा COVID-19 पॉझिटिव्ह, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा अधिक वेगाने वाढू लागला आहे. आता प्रसिद्ध अभिनेते कुमुद मिश्रा (Actor Kumud Mishra) यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

    नवी दिली, 27 एप्रिल : प्रसिद्ध अभिनेते कुमुद मिश्रा (Actor Kumud Mishra) यांना कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झाला आहे. त्यांना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Corona) रीवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कुमुद मिश्रा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुमुद यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुमुद सध्या ऑक्सिजन प्रणालीवर असून त्यांची तब्येत सुधारत आहे. सुरुवातीला कुमुद यांच्या आईची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आपल्या आईची काळजी घेत असताना या अभिनेत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. अलिकडे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये नील नितीन मुकेश, सुमित व्यास, समीरा रेड्डी आदींचा समावेश आहे. त्यानंतर आता  कुमुद मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाली आह. हे वाचा-कोरोनावर मात करण्यासाठी नम्रता शिरोडकरचा ‘हा’ सल्ला नक्की पहा काही दिवसांपूर्वी लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यातील श्रवण कुमार राठोड यांचे कोविड -19 आणि त्याच्याशी संबंधित इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे निधन झाले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, गोविंदा, कॅटरिना कैफ, कार्तिक आर्यन, किरण कुमार, अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी, अभिनेत्री तारा सुतारिया इत्यादींचा समावेश आहे. हे वाचा - कार्तिक आर्यनने सार्वजनिक ठिकाणी 'हा' स्टंट करण्यास केली मनाई, काय आहे कारण? सध्या बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत अभिनेता रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता आशिष विद्यार्थीने देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने सांगितले होते की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कृपया तपासणी करून घ्या. माझ्यात कोरोनाचे कोणतेच लक्षण नाही, लवकरच मी बरा होईन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासाठी अमूल्य आहेत. अलशुक्रान बंधु, अलशुक्रान जिंदगी.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Corona updates

    पुढील बातम्या