Home /News /entertainment /

Actor Khalid: धक्कादायक! शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन; सेटच्या टॉयलेटमध्ये आढळला मृतदेह

Actor Khalid: धक्कादायक! शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन; सेटच्या टॉयलेटमध्ये आढळला मृतदेह

मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साऊथइंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेता खालिद (Actor Khalid Passed Away) यांचं निधन झालं आहे.

    मुंबई, 25 जून-  मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. साऊथइंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेता खालिद (Actor Khalid Passed Away) यांचं निधन झालं आहे.त्यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील वायकोमजवळ एका चित्रपटाच्या सेटवरील टॉयलेटमध्ये या ज्येष्ठ कलाकाराचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. 70 वर्षीय खालिद आपल्या शेवटच्या दिवशीसुद्धा शूटिंग सेटवर होते. पोलिसांनी सांगितले की, खालिद यांचा मृतदेह चित्रपटाच्या सेटच्या टॉयलेटमध्ये पडलेला आढळून आला. अभिनेत्याला पाहताच युनिटच्या इतर सदस्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खालिद यांनी अनेक मल्याळम कॉमेडी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खालिद हे मल्याळम मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा होते. (हे वाचा:Sidhu Moose wala: मृत्यूनंतर रिलीज झालं सिद्धू मूसेवालाचं 'SYL' गाणं; अवघ्या काही तासांत मिळाले तब्बल इतके मिलियन व्ह्यूज ) खालिद एका चित्रपटासाठी शूटिंग करत होते. अशातच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली त्यांनतर चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनीही दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. कुटुंबाबाबत सांगायचं तर, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर जिश्मीर, दिग्दर्शक खालिद रहमान आणि शिजू खालिद हे त्यांचे पुत्र आहेत. अभिनेत्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Death, Entertainment, South film

    पुढील बातम्या