मुंबई 13 मे: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) गेल्या काही दिवसांपासून सतत काहीना काही कारणांनी सतत चर्चेत आहे. कधी चित्रपटांमुळे, कधी निर्मात्यांसोबत झालेल्या विवादामुळे. काही दिवसांपूर्वीच कार्तिकचा करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शनसोबत (Dharma production) विवाद झाला होता. आणि त्यानंतर कार्तिकला ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) हा चित्रपट सोडावा लागला होता. पण आता कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आहे, कारण या नंतर आता कार्तिकच्या हातात आणखी एक नवा चित्रपट आला आहे.
कार्तिक एका प्रेमकथेवर आधारीत चित्रपटात दिसणार आहे. ‘पिंकविला’ ने दिलेल्या वृत्तानुसार साजिद नादियावाला (Sajid Nadiawala) या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर कार्तिक पहिल्यांदाच साजिद सोबत काम करणार आहे. एक लव्हस्टोरी बेस हा चित्रपट असणार आहे.
View this post on Instagram
राष्ट्रिय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidhwans) या चित्रपटांच दिग्दर्शन करणार असल्याचं समोर येत आहे. या चित्रपटातून समीर हे बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहेत. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार आहे. समीर यांनी याआधी ‘आनंदी गोपाळ’, ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘व्हाय झेड’ यांसारखे हीट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
View this post on Instagram
अद्याप चित्रपटाचं नाव ही निश्चित झालं नसून चित्रपट हा प्री प्रॉडक्शन स्टेज मध्ये आहे. तर सर्व बाबी जुळून आल्या तर लवकरच या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. चित्रपटाची ‘नादियावाला ग्रँडसन’ आणि ‘नम्हा पिक्चर्स’ मिळून निर्मिती करणार आहेत.
कुठे आणि कसा पाहता येईल सलमान खानचा ‘Radhe Your Most Wanted Bhai’?
कार्तिक या नव्या चित्रपटासह ‘धमाका’ (Dhamaka) आणि ‘भुलभूलय्या 2’ (Bhulbhulayya 2) या चित्रपटांतही दिसणार आहे. धमाका चित्रटात तो अमृता सुभाष, मृणाल ठाकूर यांच्यासोबत काम करणार आगहे. तर भुलभूलय्या २ या चित्रपटात तो कियारा अडवानी आणि तबू यांच्यासोबत दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Kartik aryan, Marathi entertainment