'लव्ह आज कल 2'च्या सेटवरील कार्तिक आर्यनचा लुक व्हायरल, ओळखणंही झालं कठीण

कार्तिक आर्यनचा या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही तो कार्तिकच आहे यावर विश्वास बसणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 09:03 PM IST

'लव्ह आज कल 2'च्या सेटवरील कार्तिक आर्यनचा लुक व्हायरल, ओळखणंही झालं कठीण

मुंबई, 07 जून : अभिनेता कार्तिक आर्यंन आणि पतौडी प्रिन्सेस सारा अली खान सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालं नसलं तरी हा सिनेमा सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांचा सुपरहिट सिनेमा 'लव्ह आज कल'चा सिक्वेल असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर कार्तिक आणि साराचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे आता लोकांना या सिनेमाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता कार्तिक आर्यनचा या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही तो कार्तिकच आहे यावर विश्वास बसणार नाही.
नुकताच 'लव्ह आज कल 2'च्या सेटवरून कार्तिक आर्यनचा एक नवा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो कार्तिक आहे की आणखी कोण हे ओळखता येणं कठीण झालं आहे. या फोटोमध्ये कार्तिक फ्रेंच बियर्ड लुकमध्ये दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर प्रोस्थेटिक्स वापर करून त्याची जॉलाइन वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे त्याचं वय जास्त वाटत आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली नेहमीच टाइमलेस लव्हस्टोरींची निर्मिती करतात. ज्या प्रेक्षकांना भावतात. त्यामुळे सारा आणि कार्तिकसोबत इम्तियाज असंच काहीतरी करत असल्याचं म्हटलं जात आहे.

कियारा अडवाणीच्या रिलेशनशीप स्टेटसवर शाहिद कपूरचा मोठा खुलासा
 

View this post on Instagram
 

@kartikaaryan on set of his next film directed by @imtiazaliofficial. Are you guys excited?


A post shared by Kartik Aaryan (@kartiikaaryan) on

इम्तियाज अली दिग्दर्शित हा सिनेमा पुढील वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन या सिनेमा व्यतिरिक्त 'पति पत्नी और वो' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दिग्दर्शक मुदस्सर अजीज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

OMG! या 5 अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं धोनीचं नाव

मलायकामुळे अर्जुनवर होतेय टीका, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close