सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण? बिग बॉस 13च्या स्पर्धकसोबत करणार रोमान्स

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाची सर्वांनाच खूप उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाची सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. पण आता एका बॉलिवूड अभिनेता आणि प्रोड्युसरनं सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा खुलासा केला आहे. याशिवाय तिच्यासोबत बिग बॉस 13 मधील एक स्पर्धकही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं या अभिनेत्यानं म्हटलं आहे.

बिग बॉस 13 च्या फिनालेनंतर प्रोड्युसर आणि अभिनेता केआरकेनं एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यानं शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचं म्हटलं आहे आणि तिच्यासोबत बिग बॉस 13 चा उपविजेता आसिम रियाज सुद्धा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर या दोघांना बॉलिवूड निर्माता करण जोहर लॉन्च करणार असल्याचंही त्यानं त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला Filmfare Award, पाहा यंदा कोणी मारली बाजी

 

View this post on Instagram

 

#stylesupreme #airforce#addidas#stylemen #style #streetstyle#lifestyles#thugkicks #jordans#jordanair #mumabi#india

A post shared by Asim Riaz (@asimriaz77.official) on

केआरकेनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलं, माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार, ‘प्रोड्युसर करण जोहर सुहाना खान आणि आसिम रियाजला त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी साइन करेल.’ केआरकेचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याबाबत करण किंवा आसिम रियाज यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र तरीही आसिम आणि सुहानाच्या चाहत्यांनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत.

Bigg Boss 13 सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर, मिळवलं एवढ्या लाखांचं रोख बक्षीस

आसिम रियाज बद्दल बोलायचं तर बिग बॉस 13 नं त्याला खूप मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. इतकंच नाही तर WWE रेसलर जॉन सीना सुद्धा त्याचा चाहता झाला. त्यानं दोन वेळा आसिमचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याला जिंकवण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय स्वतः बिग बॉसनं सुद्धा आसिमचं कौतुक केलं होतं. सुत्राच्या माहितीनुसार आसिम लवकरच सनी लिओनीसोबत एक प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे.

Lakme Fashion Week 2020 जान्हवी की सनी लिओनी कुणाचा कॅटवॉक बेस्ट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2020 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading