'गुलाम'मधील अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ; व्हायरल व्हिडीओचं FACT CHECK

'गुलाम'मधील अभिनेत्यावर भाजी विकण्याची वेळ; व्हायरल व्हिडीओचं FACT CHECK

कोरोना लॉकडाऊनमध्ये अभिनेता जावेद हैदर (Javed Hyder) भाजी विकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

  • Share this:

मुंबई, 28 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. टीव्ही मालिका आणि सिनेमांचे देखील शूटिंग बंद होते असल्याने अनेक छोट्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अभिनेता जावेद हैदर (Javed Hyder) आर्थिक अडचणींमुळे भाजी विकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

जावेदने गुलाम, चांदनी बार या चित्रपटांमध्ये तर जिनी और जुजू सारख्या मालिकांमध्ये काम केले होते. अभिनेत्री डॉली बिंद्रा (Dolly Bindra)ने जावेद हैदरचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता कोरोना लॉकडाऊनमध्ये तो आर्थिक अडचणीत असल्याने आता भाजी विकू लागलं, असं सांगितलं जाऊ लागलं.

मात्र खुद्द जावेदनं आता याबाबत खुलासा केला आहे. हैदरनं आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या नाही. तर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण भाजी विकतानाचा हा व्हिडीओ बनवल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - सुशांत सिंह राजपूतला 'शुद्ध देसी रोमान्स'साठी मिळाले होते 30 लाख

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जावेद म्हणाला, "मी भाजी विकत नाही आहे. मी व्यवसायाने एक अभिनेता आहे आणि लॉकडाऊनमुळे मी सध्या काहीच करू शकत नाही. अभिनेता म्हणून स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी मी अॅपवर माझे म्युझिकल व्हिडीओ बनवणं सुरू केलं आहे. माझी मुलगी हा अॅप वापरते आणि तिने मला व्हिडीओ बनवण्यास प्रोत्साहित केलं"

हे वाचा - आलिया आणि महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल, 'सडक 2' पोस्टर लाँचनंतर नेटकरी संतापले

"मी काही चांगल्या मेसेजसह व्हिडीओही बनवले. एक दिवस एका भाजी विक्रेत्याची परवानगी घेऊन मी त्याच्या जागी भाजी विकताना माझा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. देवाच्या कृपेनं अजूनतरी मला आर्थिक अडचण आली नाही. मात्र भविष्यात असं झालं आणि भाजी विकायची वेळ आली तरी मी मला त्याची लाज वाटणार नाही. कारण कोणतंही काम छोटं नसतं. कारण कोणतंही काम छोटं नाही हेच या व्हिडीओतून सांगण्याचा प्रयत्न मी केला", असं जावेदनं सांगितलं.

संपादन - प्रिया लाड

First published: June 30, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading