Home /News /entertainment /

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; पहिल्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; पहिल्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

अनुष्का शर्मानं दिली बाबिल खानला संधी; अभिनय पाहून चाहत्यांना येतेय इरफान खानची आठवण

  मुंबई, 11 एप्रिल : दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irfan Khan) मुलगा बाबिल खान (Babil Khan)  हा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) निर्मित ‘काला’ (Qala)  या चित्रपटाच्या माध्यमातून तो पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर (Qala teaser)  प्रदर्शित झाला आहे. (Qala teaser released) नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर दिग्दर्शक अन्विता दत्त यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात बाबिल सोबत अभिनेत्री तृप्ती डमरी (Trupti Dimri) देखिल दिसणार आहे. बर्फाच्छादित प्रदेशात चित्रपटाचं शुटींग झाल्याचं टिझर वरून लक्षात येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Babil (@babil.i.k)

  टिझर मध्ये एका बर्फाच्छादित प्रदेशात एका चित्रपटाचचं शुटींग सुरु असल्याचं दिसत आहे. तर अभिनेता बाबिल सोबत तृप्ती ही काहीतरी शोधत आहे. अशा आशयाच हे टिजर आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. पण अनेक दिग्गजांनी बाबिल ला शुभेच्छा दिल्या आहेत. व चित्रपटाची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

  बिग बींचा ‘जलसा’ बंगला आहे ऐतिहासिक; या प्रसिद्ध व्यक्तीनं केलं होतं मुळ बांधकाम

  नुकतेच बाबिल ने फिल्मफेअर (Filmfare) सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या बाबंच्या वतीने म्हणजेच दिवंगत अभिनेता इरफान खानच्या वतीने त्याने पुरस्कार स्वीकारला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Babil (@babil.i.k)

  बाबिल हा अभिनेता इरफान खानचा मुलगा आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यातच इरफान ने जगाचा निरोप घेतला होता. अनेक दिवस कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी तो झूंज देत होता पण अखेर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला होता. तर आता त्याचा मुलगा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तेव्हा इरफान सारखीच अभिनयाची जादू बाबिल देखिल दाखवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या