न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यावर हे होते इरफानच्या आयुष्यातील 6 भावुक क्षण

न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यावर हे होते इरफानच्या आयुष्यातील 6 भावुक क्षण

आजारचं निदान झाल्यावर त्यानं पत्नी सुतापा बद्दल केलेलं वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्ट आजही सर्वांना भावुक करुन जातात.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इरफान खाननं आज मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सामान्य कुटुंबातील मुलगा ते बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता हा त्याचा प्रवास खरंच थक्क करणारा होता. काही मोजक्याच भूमिका साकारुनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याला 2 वर्षांपूर्वी न्यूरोएंडोक्राइनचं निदान झालं होतं. मात्र अशा परिस्थितीही त्यानं कधीच हिंमत हारली नाही. पण या आजारचं निदान झाल्यावर त्यानं केलेल्या सोशल मीडिया पोस्ट आणि पत्नी सुतापा बद्दल केलेलं वक्तव्य आजही सर्वांना भावुक करुन जातात.

इरफानला 2018 मध्ये पहिल्यांदा त्याला एक दुर्मिळ आजार झाल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानं लिहिलं, कधी कधी उठल्या उठल्या तुम्हाला धक्का बसतो. मागच्या 15 दिवसांपासून माझं आयुष्य सस्पेन्स स्टोरी बनलं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मला असा दुर्मिळ आजार होईल. मी आयुष्यात कधीच हार मानली नाही. मला हव्या असलेल्या गोष्टीसाठी संघर्ष केला. आता या परिस्थितीत माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. शक्य तेवढे प्रयत्न आम्ही करत आहोत. पुढील 10 दिवसांनी आजाराचं निदान होईल. तोपर्यंत तुमच्या शुभेच्छा सोबत असू द्या.

या पोस्टनंतर काही दिवसांनी इरफाननं त्याला न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानं Margaret Mitchell's यांची आपल्या आयुष्यात अपेक्षित घटना घडण्याला कोणत्याही गोष्टीचं बंधन नाही अशा आशयाची ओळ शेअर करत त्यानं या आजारचं निदान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

न्यूरोएंडोक्राइनच्या उपचारांच्या काही महिन्यांनंतर, इरफान एका वृत्तसंस्थेशी बोलताना न्यूरोएंडोक्राइनचं निदान झाल्यापासून ते त्याच्याकडे पाहण्याच्या बदलेल्या दृष्टीकोनाविषयी म्हणाला, केमोच्या चौथ्या टेस्टनंतर मला अजून सहा वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागणार आहेत. तिसऱ्या टेस्टनंतर निकाल सकारात्मक आले होते. तो पुढे म्हणाला होता, 'मला हा आजार आहे आणि काही महिन्यांत किंवा एक किंवा दोन वर्षात मी जगाचा निरोप घेऊ शकतो.' त्याचं हे वक्तव्य खूपच भावूक करणारं होतं.

'पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला' इरफानचे वडील असं म्हणण्यामागे काय होतं कारण

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जवळपास एक वर्ष कर्करोगाशी झुंज देऊन इरफान मायदेशी परतला होता. त्यानंतर त्यानं त्याच्या ट्विटर हॅन्डलवरुन एक पोस्ट केली होती जी खूप भावुक करणारी होती. त्याची ही पोस्ट खूप व्हायरलही झाली होती. "कदाचित कुठेतरी काहीतरी जिंकण्याच्या नादात आपण प्रेम करणे विसरुन जातो... या कठीण काळात मला ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. वर्षभरात तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी तुमचे आभार. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळेच मी परत आलो आहे.

कर्करोगावर उपचार घेऊन भारतात परतल्यानंतर इरफाननं मुंबई मिररला एक मुलाखत दिली होती ज्यात त्यानं त्याची सपोर्ट सिस्टम म्हणजेच त्याच्या पत्नीचे जाहिर आभार मानले होते. या मुलाखतीत त्याला या संपूर्ण प्रवासातील पत्नीच्या योगदानाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना तो म्हणला, 'तिच्याबद्दल काय सांगू. या सर्व प्रवासात ती माझ्यासाठी दिवसातले 24 तास सोबत होती. जर मला जगण्याची संधी मिळाली तर मला तिच्यासाठी जगण्याची इच्छा आहे.'

फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा

अंग्रेजी मीडियम या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी इरफान खाननं एक भावूक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यानं प्रकृतीच्या कारणानं या सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचा हा व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल झाला होता.

आजारपणामुळे तो बॉलिवूडपासून दूर होता. मात्र प्रकृती सुधारल्यावर त्यानं 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. याआधी रिलीज झालेल्या त्याच्या ‘हिंदी मीडियम’ सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मात्र आजारपणातचं शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रमोशनलाही उपस्थित राहू न शकलेल्या इरफानचा हा शेवटचा सिनेमा ठरला.

(संपादन- मेघा जेठे.)

First published: April 29, 2020, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading