मुंबई, 28 जून : देशभरात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्व सेवा बंद असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अशातच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक अभिनेता रस्त्यावर गाडीवरुन भाजी विकत असल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये मालिका आणि चित्रपटांचे शूटिंग बंद असल्याने या अभिनेत्यावर पोट भरण्यासाठी भाजी विकण्याची वेळ आली आहे.
चांदणी बार, गुलाम या चित्रपटात काम करणारा अभिनेता जावेद हैदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्रा हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.
He is an actor aaj woh sabzi bech raha hain javed hyder pic.twitter.com/4Hk0ICr7Md
— Dolly Bindra (@DollyBindra) June 24, 2020
हे वाचा-Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर
लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने या अभिनेत्या पोटासाठी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. नेटकऱ्यांनी कोणतेही काम लहान-मोठे नसले असं म्हणत आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने हे काम हाती घेतल्याची भावना व्यक्त केली जात आहे.