लग्नाच्या 8 वर्षानंतर अभिनेता इम्रान खान घेणार घटस्फोट? पत्नीनं शेअर केली इमोशनल पोस्ट

इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केलं. २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद सुरु आहेत.

  • Share this:

अभिनेता इम्रान खान सध्या त्याच्या बॉलिवूड करिअरपेक्षा पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आहे. मागच्या काही काळापासून इम्रान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्यामध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा आहेत.

इम्रान आणि अवंतिका यांची लव्ह लाइफ ही कोणत्याही परीकथेपेक्षा कमी नव्हती. पण, आता त्यांच्यात परीकथेसारखं काही राहिलं नाही असंच त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे. दोघांमध्ये अनेक कारणांवरून वाद सुरू झाले आहेत.

मागच्या बऱ्याच काळापासून त्यांच्यात मतभेद होत असल्याच्या चर्चा फक्त अफवा आहेत असं बोललं जात होतं. मात्र आता हे वाद वाढले असून अवंतिका आणि इम्रान लवकरच घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

अवंतिकाने इम्रानचं पाली हिल येथील घर बऱ्याच दिवसांपूर्वी सोडलं. ती सध्या आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. नुकतीच तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ज्यावरुन आता लवकरच घटस्फोट घेतील असं म्हटलं जात आहे.

अवंतिकानं Morgan Harper Nichols यांचा एक कोट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. कधी कधी तुम्ही निघून जायला हवं, ज्या गोष्टी तुम्हाला सकारात्मक उर्जा देतात त्या ठिकाणी तुम्ही जायला हवं. हा एक चांगला निर्णय असू शकतं. ज्या ठिकाणी तुमचं स्वागत केलं जाईल अशा ठिकाणी तुम्ही जायला हवं.

इम्रान आणि अवंतिकाने आठ वर्ष एकमेकांना डेट केलं. २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं. इम्रानच्या लग्नात आमिर खान, किरण रावसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

अवंतिकाने २०१४ मध्ये मुलीला जन्म दिला. आपल्या मुलीबद्दल सांगताना एका मुलाखतीत इम्रान म्हणाला होता की, ‘अवंतिकाने मला इमाराच्या रुपात जगातलं सर्वोत्कृष्ट गिफ्ट दिलं आहे.’

इम्रान अनेक वर्षांपासून रुपरी पडद्यापासून दूर आहे. त्याने २०१५ मध्ये कट्टी- बट्टी या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर इम्रानने एकाही सिनेमात काम केलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या