अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात; मागून दुसऱ्या कारने दिली धडक

अभिनेता गोविंदाच्या कारला अपघात; मागून दुसऱ्या कारने दिली धडक

रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

  • Share this:

शिखा धारिवाल/मुंबई, 24 जून : अभिनेता गोविंदाच्या (govinda) कारला (car) अपघात झाला आहे. गोविंदाच्या कारला मागून दुसरी कार धडकली आहे. ही दुसरी कार यशराजची असल्याचं सांगितलं जातं आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान जुहूमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोविंदाची कार पुढे होती आणि मागून यशराजची कार होती. यशराजच्या कारने गोविंदाच्या कारला धडक दिली. गोविंदाच्या कारला अपघात झाला तेव्हा त्या कारमध्ये गोविंदा नव्हता. मात्र त्याचा मुलगा यशवर्धन गाडीत होता आणि कार ड्रायव्हर चालवत होता. अचानक या कारला यशराजची कार मागून येऊन धडकली. ही कार ड्रायव्हर चालवत होता.

हे वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमचा खुलासा

दरम्यान या कार अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही आहे. कारचं थोडं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं आहे.

अपघातानंतर दोन्ही पक्षांनी हा वाद आपसात मिटवला आहे. अपघातप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही, अशी माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 24, 2020, 11:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या