सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान मार्व्हेल स्टुडिओजसोबत प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी इतर आंतरराष्ट्रीय कलाकार आणि क्रू मेंबर्स सोबत बँकॉकमध्ये (Bangkok) आहे. पण या प्रोजेक्टविषयी आणखी काहीच गोष्टी उघड करण्यात आल्या नाहीत. र्वकाही गोपनीय ठेवण्यात आलं आहे. हे वाचा - ‘अक्षय कुमार मला गुप्तपणे फोन करतो’; कंगना रणौतनं केला चकित करणारा दावा मार्व्हेल स्टुडिओ (Marvel studios) हा अमेरिकन फिल्म आणि टेलिव्हिजन स्टुडिओ (American film and television studio) आहे. या स्टुडिओजचे अनेक चित्रपट मालिका या जगभरात पाहिल्या जातात. तसंच जगभरात त्यांचे चाहते आहेत. तर आता फरहानचं नाव मार्व्हेल सोबत जोडलं जात असल्याने त्याचे चाहतेही भारावून गेले आहेत. तर या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी आता त्याचे चाहते उत्सुक आहेत. हे वाचा - अभिनेत्यानं केला कोट्यवधींचा घोटाळा; सापळा रचून FBI नं केली अटक फरहान बॉलिवूड (bollywood) मधील एक नावाजलेला अभिनेता आहे. अभिनसोबतच तो गायक, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकसुद्धा आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘तूफान’ (Toofan) हा फारच चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, International