मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकेकाळी जाडेपणामुळे झाला होता ट्रोल; फरदीन खानचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते म्हणाले...

एकेकाळी जाडेपणामुळे झाला होता ट्रोल; फरदीन खानचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते म्हणाले...

अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) पुहा एकदा चर्चेत आला आहे. या चर्चेमागचं कारण आहे फरदीनचे सोशल मीडियावर वायरल झालेले फोटो. या फोटोतील फरदीनचं ट्रान्सफॉर्मशन बघून त्याचे फॅन सरप्राईस झाले आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 06 डिसेंबर:  'दुल्हा मिल गया' (Dulha Mil Gaya) या सिनेमानंतर मोठ्या पडद्यावरून गायब झालेला अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) अचानक सोशल मीडियावर ( Social Media) ट्रेंड होताना दिसतोय. फरदीन काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक मुकेश छाबराच्या (Mukesh Chhabra) ऑफिसमध्ये दिसला होता. त्याच्या या नवीन लुक मधील फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर (Celebrity Photographer) मानव बंगालीने (Manav Bangali) शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फरदीन ग्रे टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स मध्ये दिसून येत आहे. यापूर्वी 2016 मध्ये फरदीनला त्याची बहीण लैला (Laila Khan) बरोबर ओअर साईज लुकमध्ये  स्पॉट केलं होत. तेव्हा फरदीनने एवढं वेट पुट ऑन केलं होतं की, त्याला ओळखणंदेखील अशक्य झालं होत. पण आता या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टनुसार फरदीनने पुन्हा एकदा आपलं वजन नियंत्रण आणल्याचं दिसत आहे.
फरदीनच्या या ट्रान्सफॉर्म लूकवर त्याचे फॅन्स  (Fans) लाईक आणि कॉमेंटसचा पाऊस पाडत आहेत. तसेच फरदीनने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये (Bollywood) कमबॅक करावं अशी इच्छा फरदीनचे फॅन व्यक्त करत आहेत. फरदीन खान अभिनेता फिरोज खानचा (Firoz Khan) मुलगा असून त्याने 2000 साली जंगल (Jungle) या सिनेमातून उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) बरोबर Debut केला होता त्यानंतर फरदीनने 'प्यार तूने क्या किया' (Pyar Tune Kya Kiya), 'हम हो गए आपके' (Hum Ho Gaye Aapke), 'खुशी' (Khushi), 'देव' (Dev), 'प्यारे मोहन' (Pyare Mohan) , 'लाइफ पार्टनर' (Life Partner) सारख्या सिनेमातून प्रसिद्धी मिळवली होती. 2000 च्या दशकात मोठ्या पडद्यावर कमाल करणारा  फरदीन आता स्वतःच्या लूकमध्ये ट्रान्सफॉर्म  करून पुन्हा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता नाकारता येऊ शकणार नाही. तरी फरदीचे फॅन त्याला बघून आनंदी झाले आहेत.
First published:

Tags: Bollywood, Weight loss

पुढील बातम्या