Home /News /entertainment /

रितेश देशमुखसोबत फरदीन खान करणार चित्रपटांत कमबॅक; या कारणाने घेतला होता ब्रेक

रितेश देशमुखसोबत फरदीन खान करणार चित्रपटांत कमबॅक; या कारणाने घेतला होता ब्रेक

फरदीन खान 'विस्फोट' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. चित्रपटात तो रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) स्क्रीन शेअर करणार आहे.

  मुंबई 13 सप्टेंबर : दिवंगत अभिनेते फिरोज खानचा मुलगा फरदीन खानने (Fardeen Khan) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगितंल होतं की तो चित्रपटांत पुनरागमन करण्यास तयार आहे. आता फरदीन खान 'विस्फोट' चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याचे समोर आलं आहे. या चित्रपटात तो रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) स्क्रीन शेअर करणार आहे. संजय गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. फरदीननेही स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याची माहिती केली आहे. फरदीन खानने डिसेंबर 2020 मध्ये स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "मी इतका काळ चित्रपटांपासून दूर राहीन असं वाटलं नव्हतं. पण ते घडलं. सुरुवातीला, माझी पत्नी नताशा आणि मला लंडनला जावं लागलं कारण आम्हाला बाळाशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. 2013 मध्ये, आम्हाला एक मुलगी झाली. चार वर्षांनंतर आमच्या मुलाचा जन्म झाला. प्रत्येक वेळी घरात खूप आनंद असायचा आणि आपण त्यात राहायला हवं. इतका वेळ कधी गेला, मला माहित नाही. मुंबई आणि लंडन दरम्यान अप-डाउन करावं लागलं. कारण आम्ही आयव्हीएफ प्रक्रियेची निवड केली होती, माझी पत्नी नताशासाठी हे सोपं नव्हते. मला त्यांच्याबरोबर राहायचं होतं. "

  मुनमुननंतर आता राजही संतापला; अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, 'माझं आयुष्य...'

  फरदीन खानला सुरुवातीला वाटलं की त्याला फक्त दोन किंवा तीन वर्षे मुंबईपासून दूर राहावं लागेल. तो म्हणाला, “मला वाटतं जर आयुष्य इतकं सोपं असतं! मुंबईपासून दूर जाण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं, मी परिस्थितीला सामोरा जात होतो. आता मी दोन सुंदर मुलांसह आनंदी आहे आणि कामापासून दूर आहे. मी त्यांच्यासोबत घालवलेला वेळ सुंदर आहे. माझ्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये एक सुंदर बंध आहे. मी स्वतःला दररोज धन्य मानतो. " फरदीन खान पुढे म्हणाला, “मला देवाचे आभार मानायला खूप काही आहे. मला वाटते की माझ्यावर कामावर परत जाण्याची वेळ आली आहे. माझं कामावर परतणं सुरळीत पार पडले. जेव्हा ते व्हायचे होते तेव्हा ते घडले. परत आल्यावर मला आढळलं की चित्रपटसृष्टीचं संपूर्ण दृष्य बदलेलं आहे. फरदीन खानने स्पष्ट केले की तो बॉलिवूडमध्ये दर्जेदार काम करण्यास तयार आहेत. तो म्हणाला, “मी नेहमीच मुंबई आणि लंडन दरम्यान प्रवास करतो. मी माझा अर्धा वेळ तिथे आणि अर्धा वेळ इथे घालवला. यावेळी मी एका उद्देशाने परत आलो आहे. मला चांगले अर्थपूर्ण काम करायचे आहे. मला वाटतं हा सिनेमाचा नवा सुवर्णकाळ आहे. सिनेमाची अशी विविधता घडताना पाहून उत्साह येतो.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Riteish Deshmukh

  पुढील बातम्या