मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मला 'दक्षिणात्य अभिनेता' म्हणून ओळखलं जावं असं वाटत नाही; असं का म्हणाला धनुष?

मला 'दक्षिणात्य अभिनेता' म्हणून ओळखलं जावं असं वाटत नाही; असं का म्हणाला धनुष?

धनुषनं दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे धनुषच्या वैविध्यपूर्ण भूमिकेंचं नेहमीच कौतुक होत असल्याचं पहायला मिळतं.

    मुंबई, 24 जुलै : आपल्या अभिनयानं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणारा दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणजे धनुष (Dhanush). धनुषनं दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळे धनुषच्या वैविध्यपूर्ण भूमिकेंचं नेहमीच कौतुक होत असल्याचं पहायला मिळतं. अशातच धनुष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारणही काही खासच आहे. साऊथचा सुपरस्टार धनुष लवकरच हॉलिवूड पदार्पण करणार आहे. त्यामुळे तो सध्या तो जोरदार चर्चेत आहे. त्याच्या आगामी 'द ग्रे मॅन' चित्रपटामुळे खूप चर्चेत असून हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मुंबईत चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या प्रमोशन आणि प्रीमिअरच्या वेळी धनुषसह दिग्दर्शक अॅंथनी रुसो आणि जो रुसो देखील उपस्थित होते. यावेळी धनुषनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यानं सांगितलं की मला 'दक्षिणात्य अभिनेता' म्हणून ओळखले जावे असं वाटत नाही. हेही वाचा -  Myra Vaikul: रील बनवताना चिमुकल्या परीची झाली भलतीच अवस्था, पाहा VIRAL VIDEO आम्हा सर्वांना दक्षिण किंवा उत्तरेकडील अभिनेते न म्हणता भारतीय अभिनेते म्हटले तर मला त्याचे कौतुक होईल. केवळ दक्षिण, उत्तर किंवा प्रादेशिक उद्योगातीलच नव्हे तर राष्ट्रीय चित्रपटांसाठी आपण एकत्र काम केले आणि सर्वांसाठी चित्रपट बनवले तर खूप चांगले होईल, असं धनुषनं म्हटलं. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही एक चांगली वेळ असल्याचं धनुषनं म्हटलं. तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यामुळे आता मला किंवा इतर कोणालाही दाक्षिणात्य अभिनेता म्हणण्यात काही अर्थ नाही. आम्ही फक्त भारतातील कलाकार आहोत, असं धनुषनं मीडियाशी संवाद साधताना म्हटलं. 'द ग्रे मॅन' धनुषचा हा पहिला हॉलीवूड चित्रपट आहे. यापूर्वी धनुषनं तेलुगूमध्ये 'सर', हिंदीमध्ये 'रांझना', 'शमिताभ' आणि 'अतरंगी रे' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Hollywood, South indian actor, Upcoming movie

    पुढील बातम्या