S M L

मराठी बिग बाॅसमध्ये अवतरणार खंडोबा?

जय मल्हार' या मालिकेतील खंडोबाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 13, 2018 03:44 PM IST

मराठी बिग बाॅसमध्ये अवतरणार खंडोबा?

13 एप्रिल :  मराठी बिग बाॅसचं काऊंटडाऊन सुरू झालंय. येत्या रविवारपासून बिग बाॅस सुरू होतंय. 'मराठी बिग बॉस'ची घोषणा झाल्यापासून या बिग बॉसच्या घरात कोण कोणते कलाकार दिसणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता कायम आहे. आता 'मराठी बिग बॉस'मध्ये सहभागी होणाऱ्या आणखी एका कलाकाराचं नाव समोर आलंय. तो म्हणजे सगळ्यांचा लाडका जय मल्हारमधला खंडोबा.

'जय मल्हार' या मालिकेतील खंडोबाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय. बिग बॉस'साठी मला विचारण्यात आलं होतं. मात्र मी माझ्या कामांमध्ये व्यस्त असल्याने नकार दिला. पण 'वाईल्ड कार्ड एण्ट्री'साठी मला विचारलं तर मी नक्की विचार करेन असं देवदत्तने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 03:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close