कधी काळी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा अभिनेता आज आहे बॉलिवूड सुपरस्टार!

कधी काळी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा अभिनेता आज आहे बॉलिवूड सुपरस्टार!

बॉलिवूडमध्ये येण्याआधी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असे पण वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेल्या एका सिनेमानं त्याचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी नव्या कलाकारांची एंट्री होते. पण त्यातील अवघे काही लोकचं या ठिकणी स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी ठरतात. असा एक अभिनेता, जो बॉलिवूडमध्ये येण्याआधी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असे पण वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेल्या एका सिनेमानं त्याचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं आणि आता हाच अभिनेता बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. हा अभिनेता म्हणजे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बोमन इराणी. आज त्यांचा 60 वा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...

एक काळ असा होता की बोमन यांना कधीच बॉलिवूडमध्ये यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट शिकून 5 स्टार हॉटेलमध्ये सरळ वेटरची नोकरी पत्करली. याचा खुलासा त्यांनी ‘राज्यसभा टीव्ही’चा चॅट शो ‘गुफ्तगू’मध्ये स्वतःच केला आहे. सिनेमात येण्याआधी ते फोटोग्राफी सुद्धा करत असत, याशिवाय काही नाटकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. मात्र त्यांना कधी अभिनेता व्हायचं नव्हतं आणि या नादात त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमे नाकारले.

काय आहे सनी लिओनीच्या हाॅट फिगरचं गुपित, जाणून घ्या तिचा Diet Plan

बोमन इराणी अभ्यासात फारसे चांगले नव्हते. त्यामुळे शालेय शिक्षण संपल्यावर त्यांच्याकडे जास्त काही पर्याय राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी ठरवलं की ते काहीतरी असं करतील ज्यात ते खूप चांगलं काम करू शकतील. त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलं आणि 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. जवळपास 2 वर्ष अशी नोकरी केल्यानंतर त्यानी दुकानदारी सुरू केली. दरम्यान त्यांना सिनेमाचं प्रचंड वेड जडलं होतं. त्यामुळे दुकान बंद केल्यानंतर ते सिनेमा पाहायला जात असत.

Wedding Anniversary: 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली होती निक-प्रियांकाची लव्हस्टोरी!

वयाच्या 32 व्या वर्षी बोमन यांनी फोटोग्राफी करायला सुरुवात केली. पण नंतरच्या काळात वयाच्या 44 व्या वर्षी मिळालेल्या एका सिनेमानं ते सुपरस्टार झाले. हा सिनेमा होता राजकुमार हिरानी यांचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. खरं तर त्यांना या सिनेमातही काम करायचं नव्हतं. त्यांना एक नामांकित फोटोग्राफर व्हायची इच्छा होती मात्र फिल्म मेकर विनोद चोप्रा यांच्या सांगण्यावरुन त्यांनी फोटोग्राफीतून 14 दिवसांची सुट्टी घेत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर मागे वळून पाहण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही. हा सिनेमा सुपरहिट झाला आणि त्या दिवसांपासून आज पर्यंत बोमन इराणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.

कार्तिक आर्यनला पकडावे लागले दीपिकाचे पाय, असं झालं तरी काय; पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: December 2, 2019, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading