भाऊ कदम ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'?

भाऊ कदम ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'?

भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट 'नशीबवान' हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं नुकतंच रिलीज झालं.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : 'चला हवा येऊ द्या'मुळे भाऊ कदम घराघरात पोचले. भाऊंचे फॅन्सही खूप आहेत. छोट्या पडद्यावरून भाऊ कदम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहेत.


भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट 'नशीबवान' हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील 'ब्लडी फुल जिया रे' हे गाणं नुकतेच रिलीज झालं. उडत्या चालीचं असणारं हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केलंय. सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केलं आहे.Loading...


गाणं दिसताना जितकं रंजक, ऐकताना जितकं मजेदार वाटत आहे तितकीच मेहनत गाणं चित्रित  करताना झाली. कारण या  गाण्याचे चित्रीकरण हे एका खऱ्याखुऱ्या डान्स बार मध्ये करण्यात आले, आणि हा डान्स बार फक्त चोवीस तासासाठीच उपलब्ध होणार होता. या चोवीस तासात एवढ्या भव्य गाण्याचं शूटिंग करणं हे नशीबवानच्या टीम समोर खरंच मोठं आव्हान होतं, परंतु हे आव्हान या टीमने स्वीकारलं आणि ते अगदी लीलया पेललं सुद्धा.


अवघ्या एका दिवसात या गाण्याचे संपूर्ण  शूटिंग चांगल्या पद्धतीनं पार पडलं. मुख्य म्हणजे ज्या डान्स बारमध्ये हे चित्रीकरण  सुरू होतं त्या डान्स बारच्या बाहेर कोणालाही कल्पना नव्हती की इथे सिनेमाचं शूटिंग चालू आहे. या सर्व मेहनतीची पोच पावती म्हणजे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच या गाण्यामध्ये आनंद शिंदे याची एक खास झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.


उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दिवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान'  हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...