Home /News /entertainment /

'नेहमी तुमच्या बरोबर...', आजारी असणाऱ्या सुरेखा सिकरींसाठी आयुष्मानचा खास मेसेज

'नेहमी तुमच्या बरोबर...', आजारी असणाऱ्या सुरेखा सिकरींसाठी आयुष्मानचा खास मेसेज

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी (Surekha Sikri) यांच्या प्रकृतीसाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत. आयुष्यमान खुराना याने देखील यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यांच्यासाठी लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

    मुंबई, 10 सप्टेंबर : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) वेगळ्या भूमिका निवडण्यासाठी ओळखला जातो. चित्रपटांमध्ये विविध भूमिकांसाठी त्याचे कौतुक होत असते. अशाच धाटणीचा 2017 मध्ये एक वेगळा चित्रपट 'बधाई हो' त्याने केला होता. याच चित्रपटामध्ये सुरेखा सिकरी यांनी त्याच्या आजीची भूमिका केली होती. मात्र आता सुरेखा सिकरी (Surekha Sikri) सध्या दवाखान्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अनेकजण त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. यामध्ये आयुष्यमान खुराना याने देखील यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्यांच्यासाठी लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याने सुरेखा सिकरी यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. मंगळवारी सुरेखा सिक्रि यांना ब्रेन स्ट्रोकमुळे तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. 2018 मध्ये त्यांना हा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हा त्रास पुन्हा जाणवू लागल्यानंतर दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. (हे वाचा-200 अब्ज डॉलर मार्केट कॅप गाठणारी रिलायन्स पहिली कंपनी, शेअर रेकॉर्ड नवीन उंचीवर) आयुष्यमान खुराना यांच्याबरोबरच सुरेखा यांच्या अनेक चाहत्यांनी देखल त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. मात्र या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरेखा सिकरी गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र याविषयी बोलताना त्यांचे प्रतिनिधी विवेक सिधवानी यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी त्यांच्याबरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हे वाचा-'ड्रग्ज प्रकरणात NCB ने जबरदस्तीने घेतला कबुलीजबाब', रिया चक्रवर्तीचा आरोप) दरम्यान, सुरेखा सिकरी यांच्या आर्थिक अडचणीची माहिती समोर आल्यानंतर  इंडस्ट्रीतील काही मित्रमंडळी, निर्माते, दिग्दर्शक तसंच कलाकारांनी मदत करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला असल्याचे देखील सिधवानी यांनी स्पष्ट केले. मात्र या सर्वांच्या आर्थिक साहाय्याची गरज नसून त्यांनी सुरेखाजींसाठी प्रार्थना करावी एवढीच अपेक्षा असल्याचे सिधवानी म्हणाले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या