...अन्यथा मला किडनी विकावी लागेल; अर्शद वारसीच्या त्या ट्विटमागे काय आहे कारण

...अन्यथा मला किडनी विकावी लागेल; अर्शद वारसीच्या त्या ट्विटमागे काय आहे कारण

अर्शद वारसीने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नागरिकांना आणखी एका गोष्टीने त्रस्त केलं आहे ते म्हणजे विजेचं बिल. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत लोक कसंबसं संसार सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात बॉलिवूडमध्येही विविध कलाकारांना आपलं विजेचं बिल पाहून धास्ती भरली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यानंतर आता अभिनेता अर्शद वारसी याने विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिग्स विक्रीसाठी काढल्या आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने आपले अनुभव शेअर केले. त्याने चाहत्यांना पेंटिग्स विकत घेण्याची मागणी केली आहे. मला अदानीचं विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये म्हणले आहे.

यापूर्वी तापसी पन्नुनेही आपल्या वाढत्या विजेच्या बिलावर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनीही इतकं बिल कसं आलं असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मात्र एकाच वेळेस बिल भरणे शक्य नसेल तर इन्स्टाॅलमेंटमध्ये भरा असा सुचवलं होतं.

हे वाचा-शूटिंग दरम्यानच अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह, मनोरंजन क्षेत्रासमोर नवं आव्हान

विजेच्या मोठ्या आकड्यांच्या बिलाची भीती ही फक्त कलाकारांमध्येही नसून अनेक सर्वसामान्यांनाही मोठं बिल आल्याने त्यांच्या संकटात वाढ झाली आहे.

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: July 5, 2020, 3:45 PM IST

ताज्या बातम्या