मुंबई, 21 डिसेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावं समोर येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अर्जुन रामपालला देखील NCB ने समन्स बजावलं होतं. अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCBच्या कार्यालयात दाखल झाला आहे. या आधी 16 डिसेंबर रोजीही अर्जुनला समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नव्हता.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स (Gabriella Demetriade) हिची देखील चौकशी केली. दरम्यान आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार Gabriella आज देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली.
Actor Arjun Rampal reaches Narcotics Control Bureau (NCB) office in Mumbai, Maharashtra. He has summoned by the agency to appear before it for questioning in a drug case. pic.twitter.com/5qzDJ7Ers9
सूत्रांच्या माहितीनुसार अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं NDPS कायद्याअंतर्गत येतात. याप्रकरणी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची चौकशी झाली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील असे बरेच मोठे चेहरे एनसीबीच्या रडारवर आहेत. दरम्यान, अर्जुन लवकरच ‘नेल पॉलिश’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून त्याची लंडनमध्ये शुटींग सुरु आहे.