अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदरने सोशल मीडियावरुन मागितलं काम, 'आर्या' वेब सीरिजनंतर...

अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदरने सोशल मीडियावरुन मागितलं काम, 'आर्या' वेब सीरिजनंतर...

2008 मध्ये त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात वूडस्टॉक व्हिला या सिनेमातून केली होती. त्याने आपल्या अकाउंटवर एक सेल्फी पोस्ट करत काम हवे आहे असं म्हटलं आहे

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actor) अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kiran Kher) यांचा मुलगा सिकंदर खेर (Sikandar Kher) याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो काम मागताना दिसून येत आहे. 2008 मध्ये त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात वूडस्टॉक व्हिला या सिनेमातून केली होती. त्याने आपल्या अकाउंटवर एक सेल्फी पोस्ट करत काम हवे आहे असं म्हटलं आहे.

सिकंदरने ही पोस्ट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या पुढील प्रोजेक्टसाठी प्रार्थना करत आहेत. तर त्याने आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. एकाने त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्याला त्याचे ‘मुम भाई’ चित्रपटामधील काम प्रचंड आवडल्याचे म्हटले आहे. तुला भविष्यात अनेक कामे आणि उत्तम भूमिका मिळोत अशी प्रार्थना करत असल्याचे त्याने म्हटले. देव तुला भविष्यात उत्तम प्रोजेक्ट आणि भूमिका देवो, असेदेखील त्याने म्हटले. उत्तम काम करत रहा. तर एकाने तुझी आर्या या वेबसीरिजमधील भूमिका खूपच उत्तम असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा-Urvashi Rautela 55 लाखांचा लेहंगा घालून करीत होती Photoshoot; तोल गेला आणि...

सिकंदर अलीकडेच आर्या या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या वेब सिरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याचबरोबर 2017 मध्ये सेन्स-8 या अमेरिकेतील विज्ञान आधारित कार्यक्रमात देखील दिसला होता. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत ‘खेले हम जी जान से’, ‘प्लेयर्स’, ‘औरंगजेब’, ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘झोया फॅक्टर’ या सिनेमांमध्ये काम केले आहे.

दरम्यान, सिकंदरच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो अक्षय कुमार आणि कतरीना कैफ यांच्या सूर्यवंशी या सिनेमात दिसणार आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. सिकंदर खेर याच्या वाट्याला आतापर्यंत खूप कमी भूमिका आल्या आहेत. त्याने या भूमिका अतिशय उत्तमप्रकारे पार पाडल्या आहेत. पण त्याला हवे तसे स्थान अजूनही बॉलिवूडमध्ये निर्माण करता आलेले नाही. कोरोनाच्या काळात अनेक सिनेमांचे चित्रीकरण थांबल्याने अनेक कलाकारांवर काम न मिळण्याचे संकट ओढवले होते. त्यातच त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने हे संकट आणखीनच अधोरेखित झाले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 20, 2020, 8:34 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या