Home /News /entertainment /

‘दोन्ही डोस घेतले आता मास्क लावणार नाही’; अनुपम खेर यांचा अजब निर्णय

‘दोन्ही डोस घेतले आता मास्क लावणार नाही’; अनुपम खेर यांचा अजब निर्णय

अभिनेते अनुपम खेर सध्या शिमल्यात वेळ घालवत आहेत. पाहा त्यांचे तेथील काही व्हिडीओ.

  मुंबई 26 जून :  बॉलिवूडचे ज्येष्ट अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सध्या शिमल्यात त्यांच्या घरी वेळ घालवत आहेत. पण यादरम्यान त्यांनी तेथे संरक्षण देत असलेल्या जवानांसोबतही मजेशीर व्हिडीओ बनवले होते. यातील एका व्हिडीओत त्यांनी मास्क घलणार नसल्याचं म्हटलं आहे. अभिनेते अनुपम खेर हे शिमल्यातील (Shimla) त्यांच्या घरी निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी ते फिरत देखील आहेत. यावेळी ते घराबाहेर फिरत असताना त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. ज्यात ते एका जवानाशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक मास्क देखील आहे. तेव्हा आपण लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचं त्यांनी म्हटलं. तेव्हा त्यांनी व्हिडीओ पाहणाऱ्यांना उद्देशून म्हटलं की “पुन्हा म्हणू नका की मास्क लावला नाही...”
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  अनुपम यांच्या या व्हिडीओवर त्यांना अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तर काहींनी म्हटलं आहे की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो. तर काहींनी म्हटलं दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावप व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Anupam Kher (@anupampkher)

  अनुपम खेर हे सोशल मीडियावर फार सक्रिय दिसतात. सध्या ते शिमल्यात असल्याने तेथील निसर्गाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. अनेक व्हिडीओ ते पोस्ट करताना दिसत आहेत. (Anupam Kher video)

  करण जोहरची भविष्यवाणी ठरली खोटी; पाहा रणवीर सिंग विषयी काय म्हणाला होता करण

  सकाळी मॉर्निंग वॉकला जातानाही ते तेथील सुंदर दृश्य तसेच तैनात असलेले जवान यांच्याशी संवाद साधत व्हिडीओ बनवतात. याशिवाय अनेक ट्वीट्सही करत असतात.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Anupam kher, Entertainment

  पुढील बातम्या