Home /News /entertainment /

अनुपम खेर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता; ‘न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल’मध्ये झाला सत्कार

अनुपम खेर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता; ‘न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल’मध्ये झाला सत्कार

‘न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (Newyork city International film festival) मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (Best Actor) हा पुरस्कार अनुपम खेर यांना मिळाला आहे.

  मुंबई 7 मे : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपल्या अभिनयाने जगभरात ओळख निर्माण केली आहे. अनेक हॉलिवूड चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. तर त्यांच्या पुरस्कारांमध्ये आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. ‘न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (Newyork city International film festival) मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (Best Actor)  हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. (Anupam Kher won best actor award) अनुपम खेर यांची ‘हॅपी बर्थडे’ (Happy Birthday) या शॉर्टफिल्मची (Shortfilm) चांगलीच चर्चा आहे. याच शॉर्टफिल्म साठी खेर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ही पुरस्कार मिळाला आहे.

  करीना कपूर पोहोचली नानावटी रुग्णालयात; चाहत्यांना वाटतेय 'बेबो'ची काळजी

  अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. त्यांना लिहिलं आहे, ‘फार आनंद होत आहे, न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये पुरस्कार मिळाला. या फिल्म फेस्टीव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून माझा गौरव होणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. या पुरस्काराचं श्रेय ‘हॅपी बर्थडे’ चित्रपटाच्या सगळ्या टीमला तसेच माझी अभिनेत्री अहाना कुमरा यांना जातं. दिग्दर्शक प्रसाद कदम, पटकथाकार , प्रोडक्शन टीम आणि सगळ्यांचे खूप खूप आभार.’ हॅपी बर्थडे या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाल्यामुळे निर्माता गिरीश जोहर यांनीही आनंद व्यक्त केला. अनुपम खेर हे एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना कुमरा यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच उत्तम कामगिरी केली असही ते म्हटले. हा पुरस्कार मिळाल्याने अनेकांनी खेर यांच अभिनंदन केलं आहे. लवकरच अनुपम खेर हे ‘काश्मिर फाईल्स’ या चित्रपटात झळकणार आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Anupam kher, Entertainment

  पुढील बातम्या