मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

टीव्ही अभिनेत्यानं केली कोट्यवधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केली अटक

टीव्ही अभिनेत्यानं केली कोट्यवधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केली अटक

कंपनीतील एका गुंतवणूकदारानं आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार त्याच्या विरोधात केली आहे. (financial fraud) परिणामी मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागानं (EOW) त्याला अटक केली आहे.

    मुंबई 2 मे: एकता कपूरच्या कुसुम (kusum) या मालिकेतून नावारुपास आलेल्या अभिनेता अनुज सक्सेना (Anuj Saxena) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं गुंतवणूकदारांचे तब्बल 141 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीतील एका गुंतवणूकदारानं आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार त्याच्या विरोधात केली आहे. (financial fraud) परिणामी मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागानं (EOW) त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. प्रकरण काय आहे? अनुज एका औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचा विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी कंपनीतील गुंतवणूक वाढवण्यासाठी एक योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 141 कोटी रुपये त्याच्या कंपनीला मिळाले होते. परंतु या गुंतवणूकीचा मोबदला अद्याप कोणालाही मिळालेला नाही. परिणामी संतापलेल्या गुंतवणूकदारांनी त्याच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. शूटिंगवर जायला झाला होता उशीर; वैतागलेल्या 'Rock'नं हातांनी तोडला लोखंडी गेट  सध्या EOW अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र अनुजनं स्वत:वरील सर्व आरोप फेटाळत चौकशीलाच विरोध केला आहे. त्याच्या मते त्याची कंपनी PPE किट्स आणि हँड ग्लोजचं उत्पादन करते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्पादनांची प्रचंड गरज आहे. जर त्याच्याविरोधात चौकशी सुरु झाली तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती त्यानं कोर्टाला केली. त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण परंतु कोर्टानं मात्र त्याचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायाधिश अभिजीत नांदगावकर यांनी कडक शब्दात त्याच्या मागणीचा विरोध केला. ते म्हणाले, “अनुज जरी एक चिकित्सक असला आणि त्याची कंपनी सध्याच्या काळात महत्वाचे असलेले पीपीई किट तयार करत असली, तरी त्याने गुतवणूरदारांची फसवणूक केलीय. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तक्रारीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही” सध्या तो EOWच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Crime, Entertainment, Financial fraud, Tv actor, Tv serial

    पुढील बातम्या