Love Story : लग्नाआधी 10 वर्षं रिलेशिपमध्ये होता अंकुश चौधरी, बायको आहे हिंदीतली प्रसिद्ध अभिनेत्री

Love Story : लग्नाआधी 10 वर्षं रिलेशिपमध्ये होता अंकुश चौधरी, बायको आहे हिंदीतली प्रसिद्ध अभिनेत्री

अंकुश चौधरीच्या लग्नाला जवळापास 12 वर्षं उलटून गेलीत पण त्याची लव्हस्टोरी मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अंकुश चौधरी. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला त्याचा ‘धुरळा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. अंकुशनं याआधी दुनियादारीमध्ये साकारलेला दिघ्या असो मग क्लासमेटमधील सत्या. त्यानं नेहमी प्रत्येक भूमिका कमालीन वठवली. दुनियादारीमध्ये प्रेमाच्या दुनियेत अयशस्वी ठरलेल्या अंकुशची रिअल लाइफ लव्ह मात्र यशस्वी ठरली. 10 वर्षांच्या दिर्घकाळ रिलेशनशिपनंतर अंकुशनं अभिनेत्री दिपा परबशी लग्न केलं.

अंकुश चौधरी आणि दिपा परब एकमेकांना 10 वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. आता त्यांच्या लग्नाला जवळापास 12 वर्षं उलटून गेलीत पण या दोघांची लव्हस्टोरी मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे.

साराला उचलून घेत कार्तिक आर्यननं केला धम्माल डान्स, पाहा VIDEO

 

View this post on Instagram

 

Prince Deepa Ankush Chaudhari

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari) on

दिपा परब आणि अंकुश चौधरी यांचं शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झालं. मुंबईच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अंकुश आणि दिपा यांची ओळख अभिनयामुळेच झाली. दोघांनाही अभिनयाची प्रचंड आवड त्यामुळे कॉलेजच्या नाटक-एकांकिकांमुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेजमध्ये असताना या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं होतं.

सलमान खानचं 'भारत'प्रेम, भाईजाननं या कारणासाठी रद्द केला अमेरिकेतील इव्हेंट

 

View this post on Instagram

 

Happy Birthday Deepa

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari) on

कॉलेजमधली लव्हस्टोरी पुढेही तशीच राहिली. एकमेकांना जवळपास 10 वर्ष डेट केल्यानंतर दिपा आणि अंकुशनं 2006 मध्ये त्यांच्या नात्याला नवं वळण देण्याचा निर्णय घेत साखरपुडा उरकला. त्यानंतर एका वर्षानं हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. आता या दोघांना प्रिन्स नावाचा एक गोड मुलगा सुद्धा आहे. अंकुश चौधरी अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत फोटो शेअर करत असतो. तर दिपा हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय सध्या ती जाहीरातीतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

रानू मंडल यांचं हिमेश रेशमियासोबत नवं गाणं रिलीज, पाहा VIDEO

First published: February 7, 2020, 8:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading