• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 64 वर्षीय तरुणाचा जोश पाहून व्हाल थक्क; अनिल कपूरचा तो VIDEO होतोय व्हायरल

64 वर्षीय तरुणाचा जोश पाहून व्हाल थक्क; अनिल कपूरचा तो VIDEO होतोय व्हायरल

एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर यांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा ६४ व्या वर्षाीही इतके फिट आहेत अनिल कपूर.

 • Share this:
  मुंबई 20 जुलै : अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांना एव्हर ग्रीन म्हटलं जातं. पण केवळ अभिनय आणि लुक्स नाही तर तितकेच आतून ही ते फिट (Fitness) आहेत. त्याचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होतोय तो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. अनिल कपूर (Anil Kapoor Fitness) यांचा एक धावताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते रेसिंगच्या मैदानावर धावताना (Anil Kapoor running video) दिसत आहेत. या व्हिडिओ नंतर त्यांच्यावर अनेक प्रतिक्रिया ही आल्या आहेत. अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by anilskapoor (@anilskapoor)

  व्हिडिओला कॅपशन देत त्यांनी टोक्यो ऑलिम्पिकने (Tokyo Olympics) प्रेरित असल्याचं ही म्हटलं आहे. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी अनिल कपूर यांचं कौतुक करत कमेंट्स दिल्या. प्रसिध्द डान्स कोरियोगग्राफर फराह खानने (Farah Khan) लिहिलं की ‘पापाजी तुम्हाला तर टोक्यो मध्ये असायला पाहिजे.’ तर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या जोशाची दाद दिली.
  View this post on Instagram

  A post shared by anilskapoor (@anilskapoor)

  दरम्यान अनिल कपूर हे सध्या चित्रपटांत जास्त दिसत नाहीत. पण सोशल मीडिया ॲक्टिव्ह दिसतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते शेअर करत असतात. नुकतीच त्यांची लाडकी मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) लंडनहून परतली आहे. तिला घेण्यासाठी ते स्वतः एअरपोर्टवर गेले होते. तेव्हा सोनामला अश्रू अनावर झाले होते.

  पतीच्या अटकेनंतर शिल्पाने केलं हे काम; अश्लील चित्रफीत प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलै पर्यंत कोठडी

  सोनम सध्या लंडनमध्येच असते. पती आनंद अहुजासोबत (Anand Ahuja) ती तिथे राहते. तर अनेकदा ती भारतात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी येत असते. यावेळीही ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आली आहे. तर गेलं वर्षभर ती भारतात आली नव्हती त्यामुळे आपल्या वडिलांना पाहून तिला अश्रू अनावर झाले.
  Published by:News Digital
  First published: