महाराणी एलिझाबेथच्या महालात पोहोचलं मजनूभाईचं पेन्टिंग, अनिल कपूरनं शेअर केला फोटो

महाराणी एलिझाबेथच्या महालात पोहोचलं मजनूभाईचं पेन्टिंग, अनिल कपूरनं शेअर केला फोटो

'वेलकम' सिनेमामध्ये अनिल कपूरनं घोडा आणि गाढवाचं काढलेलं चित्र सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे

  • Share this:

मुंबई, 1 जून : बॉलिवूडचे नावाजलेले कलाकार अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांचा 2007मध्ये रिलीज झालेला 'वेलकम' सिनेमा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या सिनेमातील मजनू भाई आणि उदय शेट्टी या जोडीनं प्रेक्षकांचं खूप मनोरंजनच केलं नाही तर बराच काळ या दोन भूमिका चर्चेतही राहिल्या. या सिनेमात अनिल कपूरनं फक्त डॉनचंच काम केलं नाही तर तो चित्रकारही बनला होता.

वेलकम सिनेमामध्ये अनिल कपूरनं घोडा आणि गाढवाचं चित्र काढलं होतं. हे चित्र सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि आता हे पेंटिंग स्वतः अनिल कपूरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. नुकतीच इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. त्याआधी सर्व संघांच्या कर्णधारांची ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी भेट घेतली.

यावेळीचा फोटो बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यात महाराणी आणि सर्व कर्णधार याच्या मागे एक पेंटिंग दिसत आहे. पण सोशल मीडियवरील काही युझर्सनी हे पेंटिंग फोटोशॉप करून त्याच्या जागेवर वेलकम सिनेमातील मजनू भाईचं पेंट्ंग लावण्यात आलं.

अभिनेता अनिल कपूर यांनी हा फोटो शेअर करताना त्याला, 'मजनू भाईचं पेंटिंग दूरदूरवर जाऊन पोहचलं आहे' असं कॅप्शन दिलं आहे. यासोबतच त्यानं या पोस्टमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनाही टॅग केलं आहे. अनिल कपूरच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

'वेलकम' हा सिनेमा 2007मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत मल्लिका शेरावत, अक्षय कुमार, कटरिना कैफ, फिरोज खान, परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्या वर्षातील सुपरहिट सिनेमापैकी एक हा वेलकम सिनेमा होता.

...म्हणून Bharat च्या सेटवर कतरिना कैफनं सुनील ग्रोवरच्या कानशीलात लगावली

विकेंडला पुन्हा एकदा दिसला मलाइका अरोराचा हॉट अवतार

First published: June 1, 2019, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading