TMC खासदार नुसरत जहाँ यांचा रोमँटिक अंदाज, बेडरुममधील TikTok व्हिडीओ व्हायरल

TMC खासदार नुसरत जहाँ यांचा रोमँटिक अंदाज, बेडरुममधील TikTok व्हिडीओ व्हायरल

नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. कधी सोशल मीडियावरील फोटो तर कधी संसदेतील त्यांची विधानं. खासदार झाल्यानंतर टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केल्यानं चर्चेत आलेल्या नुसरत जहाँ यांचा पती निखिल जैनसोबतच बेडरुममधील एक रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नुसरत यांच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत आणि त्यांचा पती निखिल ‘हे शोना...’ या गाण्यावर अ‍ॅक्ट करताना दिसत आहेत. या टिक टॉक व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीत उतरत असून आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. निखिल आणि नुसरत नेहमीच असे रोमँटिक व्हिडीओ शेअर करत असतात.

Oscar Award ची नामांकनं जाहीर, यंदा ‘जोकर’चा दबदबा

View this post on Instagram

@nusratchirps love @nikhiljainoffcl #njrocks⚡⚡⚡⚡ #thenjaffair #lifeline💕 #tiktok

A post shared by Nusrat jahan fan (@nusrat.jahan.fan) on

नुसरत सध्या नवे प्रोजेक्ट आणि तिच्या संसदीय कामांत बीझी आहे. तर बिझनेसमन असलेला निखिल त्याच्या कामात बीझी असतो. मात्र हे दोघंही त्यांच्या बीझी वेळापत्रकातून एकमेकांसाठी नेहमीच वेळ काढताना दिसतात. नुसरत त्यांच्या व्हेकेशनचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच ती टिक-टॉकवरही तेवढीच सक्रिय आहे.

'आईचा पदर तो आईचाच, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही', बिग बी झाले भावुक

निखिल जैनशी लग्न केल्यानंतर नुसरतला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. निखिल हिंदू तर नुसरत मुस्लिम असल्यानं तिच्या धर्मगुरुंनी तिच्या विरोधात फतवा काढला होता. तसेच सिंदूर लावून संसदेत गेल्यानंही तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. मात्र या सर्वांनाच नुसरत मी दोन्ही धर्मांचा पुरेपूर आदर करते असं सांगत सडेतोड उत्तरही दिलं होतं.

एके काळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आता दिसते अशी

Published by: Megha Jethe
First published: January 15, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या