Home /News /entertainment /

याच्या जिभेला काही हाड! अमेयचा मराठी Tongue Twisters VIDEO पाहून काय म्हणाल?

याच्या जिभेला काही हाड! अमेयचा मराठी Tongue Twisters VIDEO पाहून काय म्हणाल?

सध्या सगळीकडे इन्स्टा रीलचं (Amey Wagh On Instagram) वारे जोरात आहे. अमेय वाघने देखील त्याच्या इन्स्टावर असेच एक भन्नाट रील शेअर केले आहे. तो म्हणतोय तसं तुम्ही बोलून दाखवा बरं एकदा..

  मुंबई, 22 सप्टेंबर 2021 ;  छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) सोशल मीडियालर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे विविध फोटो तसेच व्हिडिओ देखील शेअर करत असतो. सध्या सगळीकडे इन्स्टा रीलचं (Amey Wagh On Instagram) वारे जोरात आहे. अमेय वाघने देखील त्याच्या इन्स्टावर असेच एक भन्नाट रील शेअर केले आहे. सध्या अमेयचे हे रील सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्यायरल होत आहे. अमेय वाघने इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने म्हटले आहे की, जीभेला हाड असतंच… ते थोडं वळवावं लागतं ! त्याने असे का म्हटले आहे हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच लक्षात येईल. तसेच त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे Tongue Twisters संजना पाटणकर ह्यांनी तयार केले आहेत ! ज्यांना Acting मध्ये career करायचंय आहे त्यांनी तर ह्याचा सराव नक्की करा! या व्हिडिओत अमेय क , ख या मुळअक्षरावरून काही टंग टीवस्टर म्हटले आहेत. जीभेला नक्की आडे वेडे घ्यावे लागतील असेच याचे उच्चार आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by amey wagh (@ameyzone)

  वाचा : नवी मालिका: बेला शेंडेनं गायलेलं 'ज्ञानेश्वर माऊली'चं शीर्षकगीत यासाठी आहे खास, पाहा VIDEO त्याच्या या रीलवर अनेक मराठी कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील कमेंट करत हे जमणार नाही अमुड्या असे गंमतीने म्हटले आहे. तर तेजस्विनी पंडितने देखील आईचा..अशी काहीशी कमेंट दिले. कलाकारांसोबत चाहत्यांनी देखील यावर कमेंट केल्या आहेत. सध्या मराठी असो किंवा हिंदी कलाकार इन्साटावर रील करताना दिसत असतात.  इन्स्टावर विविध गाण्याचे रील पाहायला मिळतात. अमेयने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या