मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रीन टेस्टचा VIDEO VIRAL, 30 वर्षांनंतर त्याचीच रिअॅक्शन पाहा

अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रीन टेस्टचा VIDEO VIRAL, 30 वर्षांनंतर त्याचीच रिअॅक्शन पाहा

अक्षय हा सध्या बॉलिवूड मधील अतिशय बीझी अभिनेता आहे. अनेक चित्रपट त्याच्या हातात आहेत. ‘बेलबॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘रामसेतू’, ‘अतरंगी रे’ हे चित्रपट त्याच्या हातात आहेत.

मुंबई 18 मे : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या अभिनयामुळे आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. पण अक्षयने त्याच्या करिअरची सुरुवात अभिनयपासून नाही तर मॉडेलिंग पासून केली होती. याशिवाय तो प्रोडक्ट्स साठी जाहीराती करायचा. आणि त्यानंतर त्याने चित्रपटांची वाट धरली.

अक्षयने आजवर त्याच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिले. ‘सौंगध’ या चित्रपटापासून त्याने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 1991 मध्ये त्याने पाहिल्या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर अक्षयने अनेक हीट चित्रपट दिले. पण सध्या सोशल मीडियावर अक्षयचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतं आहे. ज्यात तो त्याची पहिली स्क्रिन टेस्ट (Akshays screen test video) देत आहे.

PHOTOS: 'स्पिलीट्सविला 12' फेम आराधना शर्माची 'तारक मेहता'मध्ये धमाकेदार एन्ट्री

या व्हिडिओत अक्षय त्याची पहिली वहिली स्क्रिन टेस्ट देत आहे. व त्यात तो मार्शल आर्टस करताना दिसत आहे. व्हिडिओत अक्षय सोबत अभिनेत्री नगमा देखिल आहे. व्हिडिओ फारुख शेख यांचा ‘जीना इसी का नाम’ या कार्यक्रमातील आहे. अक्षयने काही वर्षांपूर्वी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी हा व्हिडिओ प्ले करण्यात आला. हा व्हिडिओ पाहून अक्षय हसत हसत प्रतिक्रिया दिली होती.

First screen test of @akshaykumar

sir😍❤️#AkshayKumar

pic.twitter.com/sRRfZ2gLQi

अक्षय म्हणतो, “केस किती मोठे होते. मला वाटतं तुम्ही मला नोकरीवरून काढणार आहात.” हा काही सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या व्हिडिओ वर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

तौत्केचा बॉलिवूडच्या महानायकाला फटका; शेल्टर उडून गेल्यानं ऑफिसमध्ये शिरलं पाणी

अक्षय हा सध्या बॉलिवूड मधील अतिशय बीझी अभिनेता आहे. अनेक चित्रपट त्याच्या हातात आहेत. ‘बेलबॉटम’, ‘पृथ्वीराज’, ‘रामसेतू’, ‘अतरंगी रे’ हे चित्रपट त्याच्या हातात आहेत. तर ‘सुर्यवंशी’ (Suryavanshi) हा चित्रपट मागील वर्षभरापासून प्रदर्शनासाठी सज्ज आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Bollywood