मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ram Setu फिल्ममधील अक्षय कुमारचा लूक; बॉलिवूडच्या खिलाडीला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला कसा वाटला

Ram Setu फिल्ममधील अक्षय कुमारचा लूक; बॉलिवूडच्या खिलाडीला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला कसा वाटला

बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu)या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या बाबतची माहिती अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. यासोबत त्याने आपल्या लूकचा फोटोही शेअर केला आहे.

मुंबई, 30 मार्च : बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'राम सेतु' (Ram Setu) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. 'रामसेतु' या चित्रपटाच्या चित्रिकरणाला (30 मार्च) आजपासून सुरुवात झाली आहे. या बाबतची माहिती अक्षय कुमारनं सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. यासह त्याने आपल्या लूकचा फोटोही शेअर केला आहे. या नव्या लूकमध्ये अक्षयचे (Ashay new look) लांब केस दिसत आहेत. तसंच डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ घातलेला आहे. एका आर्किओलॉजिस्टला साजेसा हा लूक आहे. फोटो शेअर करण्याबरोबर त्यांनी चाहत्यांकडून लूकबाबत अभिप्रायही मागितला आहे. त्याचा नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'माझ्यासाठी सर्वात खास अशा चित्रपटांपैकी एक असलेल्या रामसेतु चित्रपटाच्या चित्रिकरणाला आजपासून सुरुवात केली आहे. या चित्रपटात मी एक आर्किओलॉजिस्टची भूमिका साकारत आहे. या लूकबाबत मला तुमचा अभिप्राय हवा आहे? तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.' असं म्हणत अक्षय कुमारने फोटो पोस्ट केला आहे.

'आजोबांनी केलं होतं लैंगिक शोषण, लहान बहिणीलाही सोडलं नाही,' अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट

अक्षय कुमार सोबत या चित्रपटामध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं 80 टक्के चित्रिकरण हे अयोध्येत होणार आहे. तर उर्वरित चित्रिकरण मुंबईत पूर्ण केलं जाणार आहे.  काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यासोबत अयोध्येला गेला होता. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला होत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने नुकतंच 'अतरंगी रे' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटाचं शूटींग पूर्ण केलं आहे. तर त्याचा सूर्यवंशी हा चित्रपट 30 एप्रिलला रिलीज होणार आहे. तर बेलबॉटम, रक्षाबंधन, पृथ्वीराज आणि हाऊसफुल 5 या चित्रपटांतून अक्षय कुमार रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

First published:

Tags: Akshay Kumar, Jacqueline fernandez