मीडियाशी बोलताना अजय म्हणाला, “मी नेहमीच चांगल्या कथेसोबत काम करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील मनोरंजनाचा दर्जा वाढवण्याची ही संकल्पना आहे. डिजिटल युग (digital world) मला उत्साहित करत आहे, तसेच डिझनी हॉटस्टार आणि बीबीसी सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. ‘रुद्र – द एड्ज ऑफ डार्कनेस’ ही एक उत्तम आणि आकर्षक कथा आहे. आणि हा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. पडद्यावर पोलिस साकारणं माझ्यासाठी नवं नाही, पण यावेळी पात्र हो खूप जास्त गुंतागुंतीच आणि निराळं आहे. मला या व्यक्तिरेखेबद्दल जास्त आकर्षण वाटत ते त्याच्या ग्रे कॅरेक्टर बद्दल”.View this post on Instagram
जॉन-बिपाशाचे बोल्ड सीन कसे केले होते शूट? पूजा भट्टनं सांगितला जिस्ममधील अनुभव
सीरिज एक क्राइम थ्रिलर कथा असून मुंबई आणि परिसरात याच शुटींग होणार आहे. याच वर्षी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी हॉटस्टार (Disney hotstar) ही सीरिज दिसणार आहे. पण अद्याप प्रदर्शानाची तारीख जाहीर करण्यात आली नाही.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Bollywood News