अजय देवगणनं ट्वीट केलं आहे, "काल रात्री मी माझ्या भावाला गमावलं. त्याच्या अशा अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे त्याची कमी मला नेहमी जाणवत राहिल, त्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करा" कोरोना परिस्थितीमुळे शोकसभेचं आयोजन करणार नसल्याचंही अजय देवगणनं सांगितलं आहे. हे वाचा - रोहित शर्मा आहे या बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न अनिल देवगणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. फूल और काँटे, प्यार तो होना ही था अशा फिल्मसाठी तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्यानंतर राजू चाचा, ब्लॅकमेल, हाल ए दिल अशा फिल्मचं दिग्दर्शक केलं आहे. तसंच सन ऑफ सरदार फिल्ममध्ये तो क्रिएटिव्ह डायरेक्टर होता. हे वाचा - अमर अकबर अँथनी ते हेरा फेरी..., हे आहेत विनोद खन्ना यांचे काही बेस्ट चित्रपट 2020 सालात अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. 4 ऑक्टोबरला अभिनेते विशाल आनंद (vishan anand) यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजारपणामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खानचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. दिग्दर्शक निशिकांत कामत यांचंही आजारपणामुळे निधन झालं. संगीतदार वाजिद खानचाही किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचा कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. तर तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूतनेदेखील हे जग सोडलं.I lost my brother Anil Devgan last night. His untimely demise has left our family heartbroken. ADFF & I will miss his presence dearly. Pray for his soul. Due to the pandemic, we will not have a personal prayer meet🙏 pic.twitter.com/9tti0GX25S
— Ajay Devgn (@ajaydevgn) October 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Bollywood