Home /News /entertainment /

अभिषेक बच्चन आईला घाबरतो की बायकोला? बहिणीनंच केली भावाची पोलखोल

अभिषेक बच्चन आईला घाबरतो की बायकोला? बहिणीनंच केली भावाची पोलखोल

बहीण श्वेताने अभिषेकची केली पोलखोल. पाहा काय म्हणाली.

  मुंबई 13 जून: बॉलिवूडचं प्रसिद्ध बच्चन कुटुंब (Bacchan Family) हे एक आदर्श कुटूंब म्हणून ओळखलं जातं. अमिताभ (Amitabh Bacchan) यांचेच संयमी स्वभावाचे गूण मुलगा अभिषेक (Abhishek Bacchan) याच्यात देखील आहेत. अभिषेक एक फॅमिली मॅन आहे. आपल्या कुटुंबाला तो जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्याच्या पत्नीला म्हणजे ऐश्वर्याला (Aishwarya Bacchan) सर्वात जास्त घाबरतो याचा खुलासा बहीण श्वेता नंदा हिने केला आहे. प्रसिद्ध टॉक शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि श्वेता बच्चन नंदा (Shweta Bacchan Nanda) उपस्थित होते. तेव्हा करण जोहरने त्यांच्याशी अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. यावेळी अनेक मजेशीर प्रश्नही विचारण्यात आले होते. तेव्हा करणने अभिषेकला विचारलं की तु कोणाला सर्वात जास्त घाबरतो. तेव्हा अभिषेक पटकन आई जया बच्चन (Jaya Bacchan)  यांचं नाव घेतो.
  अभिषेक उत्तर देत असतानाचं पटकन श्वेता ऐश्वर्याचं नाव घेते. व अभिषेक ऐश्वर्याला घाबरतो असं म्हणते. त्यावर अभिषेक तिला म्हणतो. “मला प्रश्न विचारला आहे, मीच उत्तर देणार, तु गप्प बस”. बच्चन कुटुंबियामध्ये जया यांना सर्वात शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. पण त्याहीपेक्षा अभिषेक ऐश्वर्याला घाबरतो ही पोलखोल श्वेताने केली होती.

  HBD : जाहिरातीतून मिळाली होती प्रसिद्धी; पाहा दिशा पाटनीचा अभिनय प्रवास

  ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनाही कुटुंबाला वेळ द्यायला आवडतं. अनेकदा ते मुलगी आराध्यासोबत एकत्र स्पॉट होतात. एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या रिलेशनशिप विषयी प्रश्न विचारले असता, तुम्ही किती भांडता असाही प्रश्न विचारण्यात आलं होता. तेव्हा ऐश्वर्या म्हणाली होती, “स्वाभाविकता पाहिलं तर आमच्या दोघांचेही व्यक्तिमत्त्व फार मजबूत आहेत. भांडणे आणि चर्चा करणे यात अगदी लहान रेघ असते. आणि आम्ही अजूनही ती शोधत आहेत. त्यामेळ आम्ही खूप चर्चा करतो आणि खूप नम्रपणे याकडे पाहतो.”
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Amitabh Bachchan, Entertainment

  पुढील बातम्या