Home /News /entertainment /

अखेर ज्युनिअर बच्चन कोरोना निगेटिव्ह! जवळपास महिनाभराने अभिषेक 'जलसा'मध्ये

अखेर ज्युनिअर बच्चन कोरोना निगेटिव्ह! जवळपास महिनाभराने अभिषेक 'जलसा'मध्ये

बच्चन कुटुंबावर असणारे कोरोनाचे संकट अखेर दूर झाले आहे. अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) कोरोना अहवाल देखील नेगिटिव्ह आला आहे.

  मुंबई, 08 ऑगस्ट : बच्चन कुटुंबावर असणारे कोरोनाचे संकट अखेर दूर झाले आहे. अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) कोरोना अहवाल देखील नेगिटिव्ह आला आहे. अभिनेत्याने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अभिषेकने पोस्ट करत नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफचे  आभार मानले आहेत. तब्बल 29 दिवसानंतर अभिषेकने कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जवळपास महिनाभराने अभिषेक जलसावर दाखल झाला आहे. अभिषेकने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'आज दुपारी माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की मी नक्की याला हरवेन. तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने केलेल्या कामाप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद'. अशाप्रकारे एकदम उत्साही शब्दांमध्ये अभिषेकने चाहतावर्ग आणि नानावटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. (हे वाचा-सुशांतचे 15 कोटी कोणत्या खात्यात वळवले? EDला रियाकडे मिळाली नाही रक्कम)
  (हे वाचा-'सुशांतची केवळ ही एकच संपत्ती माझ्याकडे आहे', रिया चक्रवर्तीचा दावा) 11 जुलै रोजी अभिषेक आणि अमिताभ यांना नानवटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर काही दिवसांनी ऐश्वर्या-आराध्याला देखील भरती करण्यात आले होते. दरम्यान 27 जुलै रोजी ऐश्वर्या-आराध्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते, तर 2 ऑगस्ट रोजी अमिताभ यांना देखील चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अभिषेकचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बच्चन कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Amitabh Bachchan

  पुढील बातम्या