Home /News /entertainment /

Tujhech Mi Geet Gaat Ahe: 'हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!' अभिजीत खांडकेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Tujhech Mi Geet Gaat Ahe: 'हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका!' अभिजीत खांडकेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Tujhech Mi Geet Gaat Ahe:हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका; अभिजीत खांडेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Tujhech Mi Geet Gaat Ahe:हाय का, पुन्हा याच्या नशिबात दोन बायका; अभिजीत खांडेकरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'माझ्या नवऱ्याची बायको' ( Mazhya Navryachi Bayko ) मालिका संपल्यानंतर मोठ्या गॅपनंतर अभिनेता 'अभिजीत खांडकेकर' पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरला आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Ahe) मालिकेत अभिजीत 'मल्हार कामत' (Malhar Kamat) हे पात्र साकारत आहे. परंतू नव्या मालिकेमुळे अभिजीतला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 मे:  'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Maziya Priyala Preet Kalena) मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण करणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे 'अभिजीत खांडकेकर' (Abhijeet khandkekar) अभिजीतने मोठ्या मेहनतीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी टेलिव्हजनवर आपली ओळख निर्माण केली. अभिजीतच्या रुपाने मराठी टेलिव्हिजनला नवा चेहरा मिळाला. अभिजीतने एकमागोमाग एक अनेक मालिकात, कार्यक्रमात काम केलं. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेनंतर अभिजीतची हिट झालेली मालिका म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazhya Navryachi Bayko) नागपूरी तडका असलेली मालिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती.  अनेकदा त्याला त्या मालिकेवरुन ट्रोल देखील करण्यात आलं. नवऱ्याची बायको मालिका संपल्यानंतर मोठ्या गॅपनंतर अभिजीत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरला आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Ahe)  मालिकेत अभिजीत 'मल्हार कामत' (Malhar Kamat) हे पात्र साकारत आहे. नव्या मालिकेत नव्या भूमिकेत असलेल्या अभिजीतच कौतुक होत आहे परंतू त्याला ट्रोलही केलं जात आहे. तुझेच मी गात आहे ही मालिका नागपूरी तडका असलेली मालिका आहे. मल्हार कामत असं अभिजीत खांडकेरच्या पात्राचं नाव असून तो उर्मिला कानिटकर कोठारे त्याच्या बायोकोची वैदेहीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेत्री प्रिया मराठे देखील मल्हार कामतची बायको म्हणून दाखवण्यात आलं आहे. मालिकेच्या सुरुवातीच्या भागांमधूनच मालिकेतील हा ट्विट प्रेक्षकांसमोर आला. एकूणच दोन्ही मालिकांमध्ये अभिजीत खांडेकरला दोन बायका असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  अभिजीत करत असलेल्या दोन्ही मालिकांमध्ये बरंच साधर्म्य आहे.  माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत गुरुनाथला दोन बायका होत्या. तर तुझेच मी गीत गात या मालिकेत मल्हारलाही  दोन बायका आहेत. आधीच्या मालिकेतही नागपूरी भाषा होती तर या मालिकेतही नागपूरी भाषा वापरण्यात आली आहे. मालिकेतील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नेटकऱ्यांनी अभिजीत खांडेकरला चांगलंच ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी म्हटलंय,' हाय का याला इथे पण दोन बायका', तर दुसऱ्या युझरने म्हटलं, 'आता अभिजीतच्या सगळ्या मालिकांमधून त्याला दोन दोन बायका देणार का?' अनेकांनी अभिजीतला ट्रोल केलं आहे तर काहींनी त्याच्या नव्या भूमिकेचं कौतुक देखील केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या येत्या भागात मल्हार वैदेहीला भेटण्यासाठी गावी जातो. तिथे गावातील लोक त्याला ओळखतात पण तो त्यांच्यापासून आपली ओळख लपवतो. दारुच्या नशेत गाडी चालवत मल्हार गावच्या दिशेने जातो. तर दुसरीकडे वैदेही रुग्णालयात आहे. आता मल्हार आणि वैदेहीची भेट होणार का? आणि स्वराच्या तिच्या वडिलांचं नाव कळणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या