मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC14: 50 लाखांसाठी Amir Khanला विचारला इतिहासातला 'हा' कठीण प्रश्न, तुम्हाला माहितेय का याचं उत्तर?

KBC14: 50 लाखांसाठी Amir Khanला विचारला इतिहासातला 'हा' कठीण प्रश्न, तुम्हाला माहितेय का याचं उत्तर?

केबीसीमध्ये भल्याभल्यांना प्रश्नाचं उत्तर देताना देवाची आठवण होते. असाच काहीसा प्रसंग आमिर खानसोबत सुद्धा घडला आहे. केबीसीच्या खेळात त्याला एक अत्यन्त कठीण प्रश्न विचारला गेला.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 08 ऑगस्ट: सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपतीच्या 14 व्या सिझनची सुरुवात झाली असून हा आठवडा ‘आझादी का महापर्व’ अशा विषयावर आधारित आहे. भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आठवड्यात अनेक प्रसिद्ध कलाकार, खेळाडू आणि देशासाठी सीमेवर लढणारे अधिकारी सहभागी झाले आहेत. नुकतंच या आठवड्याच्या पहिल्या भागात आमिर खान या अभिनेत्याने हजेरी लावली होती. आमिर खान हा मेजर डी.पी सिंग आणि कर्नल मिताली मधुमिता यांच्यासह सहभागी झाला होता ज्यात 50 लाखांचा टप्पा गाठताना त्यांना एका कठीण प्रश्नाला सामोरं जावं लागलं. (aamir khan kbc 14) आमिर खान कर्नल मिताली आणि मेजर डी.पी सिंग यांच्यासह 50 लाखांचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. पण त्यांचा इथंवरचा प्रवास सोपा नव्हता. 50 लाखांसाठी आमिरला इतिहासातील एक कठीण प्रश्न विचारला होता. ज्यासाठी त्यांना 50:50 लाईफलाईनचा उपयोग करावा लागला. तो प्रश्न असा होता, भारतातील कोणत्या राष्ट्रपतींच्या जोडीने एकमेकांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता? एस राधाकृष्णन-विवि गिरी B.विवि गिरी- झाकीर हुसेन C.झाकीर हुसेन-प्रतिभा पाटील D. राजेंद्र प्रसाद-एस राधाकृष्णन. याचं बरोबर उत्तर होतं पर्याय D. राजेंद्र प्रसाद-एस राधाकृष्णन केबीसी हा खेळ आत्तापर्यंत अनेकांचं स्वप्न पूर्ण करणारा खेळ ठरला आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यामध्ये अनेक संवाद सुद्धा झाल्याचं दिसून आलं. आमिर आपली नवी फिल्म ‘लाल सिंग चड्ढा’च्या प्रमोशनसाठी खेळात सहभागी झाले होते. त्यांच्या सोशल मीडियावरील ऍक्टिव्ह असण्यावर अनेक विनोद आणि धमाल सुद्धा खेळादरम्यान झाले.
तसंच एमसी मेरी कॉम आणि फ़ुटबाँलपटू सुनील छेत्री सुद्धा या खेळात सहभागी झाले होते. बारा लाखाच्या प्रश्नापर्यंत त्यांच्या तीनही लाईफलाईन वापरून संपल्या. त्या दोघांनीही मिळालेली धनराशी योग्य ठिकाणी डोनेट करायचं ठरवलं आहे.
First published:

Tags: KBC, Tv serial

पुढील बातम्या