आमीर (Aamir Ali) आणि संजीदा (Sanjeeda Sheikh) आठ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. पण दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना आयरा नावाची मुलगी देखील आहे. वेगळे झाल्यानंतर मुलगी संजीदाकडे असून एका मुलाखतीमध्ये संजीदाने आपल्या वेगळे होण्यावर भाष्य केले होते. यावेळी बोलताना तिने म्हटले की, आम्ही वेगळे झालो तरीदेखील मी नेहमीच त्याची हितचिंतक राहणार आहे. आम्ही नेहमीच चांगले मित्र आहोत. याचबरोबर आपल्या मातृत्वावर बोलताना देखील तिने आपल्या मुलीला सांभाळणे ती एन्जॉय करत असल्याचे म्हटले. तिची मुलगी तिची खूप चांगली मैत्रीण असल्याचे देखील तिने यावेळी म्हटले. मी सध्या माझ्या आईबरोबर राहत असून तिने मला लहानपणी कसे वाढवले असेल याचा अनुभव सध्या मला माझ्या मुलीचे संगोपन करताना करताना येत असल्याचे देखील तिने म्हटले. संजीदा शेख हिने अनेक चित्रपट, मालिका आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून सध्या तिच्याकडे कोणता प्रोजेक्ट आहे याची माहिती उपलब्ध नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Social media, Social media viral, Television, Tv, Tv actor