Home /News /entertainment /

HBD:'रामायण'शी आहे ACP प्रद्युम्न यांचं खास नातं, 'राजा दशरथ'ने बदललं शिवाजी साटम यांचं आयुष्य

HBD:'रामायण'शी आहे ACP प्रद्युम्न यांचं खास नातं, 'राजा दशरथ'ने बदललं शिवाजी साटम यांचं आयुष्य

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे 'एसीपी प्रद्युम्न' (ACP Pradyuman) या नावानेही ओळखले जातात. शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी सीआयडी (CID) मालिकेमध्ये बराच काळ काम केलं. त्या मालिकेमुळे शिवाजी साटम एसीपी प्रद्युम्न यांच्या रुपात घरोघरी पोहोचले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 एप्रिल- : ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम हे 'एसीपी प्रद्युम्न' (ACP Pradyuman) या नावानेही ओळखले जातात. शिवाजी साटम (Shivaji Satam) यांनी सीआयडी (CID) मालिकेमध्ये बराच काळ काम केलं. त्या मालिकेमुळे शिवाजी साटम एसीपी प्रद्युम्न यांच्या रुपात घरोघरी पोहोचले. सोशल मीडियावर एसीपी प्रद्युम्न यांच्या डायलॉगवर अनेक मीम्स बनवले जातात. शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. उद्या 21 एप्रिल रोजी आपला 72 वा वाढदिवस (Shivaji Satam Birthday) साजरा करत आहेत. शिवाजी साटम यांनी आपल्या कारकिर्दीत CID व्यतिरिक्त अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही झालं. शिवाजी साटम यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'नायक' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रामानंद सागर यांच्या लोकप्रिय रामायण मालिकेसोबत त्यांचं खास नातं आहे. याबद्दल लोकांना फारसं माहिती नाही. या मालिकेत त्यांनी कोणतीही भूमिका साकारली नसली तरी या मालिकेने त्याच्या करिअरमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. शिवाजी साटम यांनी अभिनयात करिअर करण्यापूर्वी ते बँकेत कॅशिअर होते. रामायणातील राजा दशरथाने दिला ब्रेक शिवाजी साटम यांची नोकरी छान सुरू होती. परंतु, बँकेतील एका स्टेज कॉम्पिटिशनने (Bank Stage Competition) त्यांना अभिनय क्षेत्रात आणलं. दरम्यान, त्यांची भेट रामायणातील राजा दशरथाची भूमिका करणारे बाळ धुरी (Baal Dhuri) यांच्याशी झाली. बाळ धुरी हे मराठी रंगभूमीचे दिग्गज अभिनेते होते. त्यांनी शिवाजी साटम यांना इंटर बँक कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करताना पाहिलं. त्यानंतर बाळ धुरी यांनीच शिवाजी साटम यांना पहिला ब्रेकही दिला होता. शिवाजी साटम यांनी 1988 मध्ये 'पेस्तनजी' चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सर्वाधिक पोलिसांच्याच भूमिका साकारल्या यानंतर शिवाजी साटम यांना बहुतांश पोलिसांच्याच भूमिका (Police Role) ऑफर करण्यात आल्या. त्यांनी सुमारे 7 चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारली होती, तसंच जवळपास दोन दशकं त्यांनी CID मालिकेत काम केलं. शिवाजी साटम यांनी 1998 मध्ये सीआयडी मालिकेत काम सुरू केलं होतं. या मालिकेने त्यांना देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. दिग्दर्शक आणि निर्माते आहेत शिवाजी साटम स्क्रीनवर गंभीर भूमिका साकारणारे शिवाजी साटम खऱ्या आयुष्यात अतिशय साधे आणि सौम्य स्वभावाचे आहेत. अभिनयासोबतच शिवाजी साटम चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मितीही करतात. त्यांना एक मुलगा असून मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकर (Madhura Velankar) ही शिवाजी साटम यांची सून आहे.
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Tv actor

    पुढील बातम्या