मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एसीपी दिव्या करतेय हवालदार शिखरेंसोबत रोमान्स; पाहा भन्नाट व्हिडीओ

एसीपी दिव्या करतेय हवालदार शिखरेंसोबत रोमान्स; पाहा भन्नाट व्हिडीओ

तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. यावेळी देखील तिनं असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हवालदार शिखरोंबत चक्क रोमांस करताना दिसत आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 27 मे: देवमाणूस (Devmanus) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली नेहा खान (Neha Khan) सध्या मराठी मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून चर्चेत आहे. तिनं या मालिकेत साकारली एसीपी दिव्या (ACP Divya Singh) ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसत आहे. परंतु या मालिकेसोबतच नेहा सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. यावेळी देखील तिनं असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हवालदार शिखरोंबत चक्क रोमांस करताना दिसत आहे.

नेहानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘पोलीसवाल्या सायकलवाल्या’ या गाण्यावर आपल्या मादक अदा दाखवताना दिसत आहे. दे दणादण या चित्रपटातील हे गाणं 1987 साली प्रदर्शित झालं होतं. “पोलीसवाल्या सायकलवाल्या, बिरेक लावून थांब, टोपी तुझी रं हातात माझ्या होईल कसं रं काम, जाऊ या डबल सीट रं. लांब लांब लांब” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा किरण यांनी डान्स केला होता. आज जवळपास 34 वर्षानंतर नेहानं या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

‘बाई तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?’ किमच्या नव्या फोटोंमुळं दुखावल्या हिंदुंच्या भावना

मालिकेत सध्या काय चाललंय?

सध्या मालिकेत डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांच्या लग्नाच्या सीनचे शूटिंग पूर्ण झाले. महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘देवमाणूस’ मालिकेची टीम बेळगावात शूटिंग करत आहे. डॉक्टर सगळ्यांना घेऊन रिसॉर्टवर आल्याचा बदल कथानकात करण्यात आला आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee Marathi