Home /News /entertainment /

 ‘बजाचं डोकं अल्ट्रा प्रोमॅक्स आहे का?’ ‘देवमाणूस’च्या नव्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

 ‘बजाचं डोकं अल्ट्रा प्रोमॅक्स आहे का?’ ‘देवमाणूस’च्या नव्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

देवमाणूस या लोकप्रिय मालिकेचा उत्तरार्ध आता सुरु झाला असून लवकर ACP दिव्या डॉक्टरला बेड्या ठोकणार आहे.

  मुंबई 30 मे: प्रेमाचं खोटं नाटक करुन महिलांना जाळ्यात ओढत त्यांचं आयुष्य उद्स्त करणारे गुन्हेगार समाजात काही कमी नाहीत. दररोज अशा धक्कादायक प्रकारांबाबत वृत्तमाध्यमांतून माहिती मिळत असते. अशाच एका गुन्हेगारावर आधारित ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. देवी सिंग (devi singh) नावाचा एक गुन्हेगार डॉक्टर होऊन गावातील लोकांना कसा लुबाडतो, महिलांचं शारिरीक आणि आर्थिक शोषण करुन त्यांच्या कशा हत्या करतो? यावर मालिकेचं कथानक आधारित आहे. या लोकप्रिय मालिकेचा उत्तरार्ध आता सुरु झाला असून लवकर ACP दिव्या डॉक्टरला बेड्या ठोकणार आहे. मात्र या अट्टल गुन्हेगाराला पकडणं दिसत तितकं सोपं नाही. गावातील लोकांचा त्याच्यावर खुप विश्वास आहे. यापैकी एक असणाऱ्या पैलवान बजानं तर डॉक्टरला पोलिसांपासून वाचवण्याचा जणू निश्चयच केला आहे. याचा एक प्रोमो झी मराठीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. यामध्ये बजा, “आता बघतो मी दिव्या मॅडम डॉक्टरला कशा पकडतात ते? जो पर्यंत बजा जिवंत आहे तो पर्यंत डॉक्टरच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही अशी शपथ घेतो.” मात्र हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “हा बजा खरंच वेडा आहे का?”, “बजाचं डोकं अल्ट्रा प्रोमॅक्स आहे का?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. डॉक्टरला पोलीस कसे पकडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यातच हा बजा डॉक्टरला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय हे पाहून काही नेटकरी संतापले आहेत. देवमाणूसचा हा नवा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सनी लियोनीचे शेजारी होताच बिग बींना होतोय त्रास; ब्लॉगद्वारे व्यक्त केला संताप
  ‘देवमाणूस’ या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. रंजक आणि रहस्यमयी कथानकामुळं ही मालिका लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या