Home /News /entertainment /

‘छपाक’ सिनेमाच्या अडचणीत वाढ, लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाची कोर्टात धाव

‘छपाक’ सिनेमाच्या अडचणीत वाढ, लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाची कोर्टात धाव

'छपाक'ची रिअल लाइफ हिरो लक्ष्मी अग्रावलच्या वकिलानंही मेकर्सच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.

    मुंबई, 09 जानेवारी : दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमा समोरील अडचणी एकमागोमाग एक वाढताना दिसत आहेत. सुरुवातीला दीपिकानं JNU हल्ल्याचा निषेध केला म्हणून त्यानंतर सिनेमातील आरोपीच नाव बदललं म्हणून या सिनेमावरुन वाद सुरू होते. त्यानंतर आता या सिनेमाची रिअल लाइफ हिरो अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रावलच्या वकिलानंही या सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. या सिनेमाचं प्रदर्शन रोखण्यासाठी लक्ष्मीची वकिल अपर्णा भटनं पटियाला हाउस कोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे. छपाक हा सिनेमा दिल्लीची अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रावलच्या हिच्या संघर्षावर आधारित आहे. अपर्णा भट या लक्ष्मी अग्रवालच्या वकील आहेत. लक्ष्मीला न्याय मिळवून देण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. अनेक वर्षं त्यांनी लक्ष्मीची केस लढली. याशिवाय या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्यातही त्यांनी बरीच मदत केली होती. मात्र या सिनेमात त्यांना कोणत्याही प्रकारचं क्रेडिट दिलं गेललं नाही. असं अपर्णा यांचं म्हणणं आहे. सनई-चौघडे वाजणार! 'या' खास व्यक्तीमुळे कंगनानं सुरू केली लग्नाची तयारी अपर्णा भट यांनी लिहिली फेसबुक पोस्ट अपर्णा भट यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यांनी छपाकच्या मेकर्सवर नाराज असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं, मी या सिनेमासाठी एवढी मदत केलेली असतानाही मला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट देण्यात आलेलं नाही. त्यामुळे यासाठी मी कायद्याची मदत घेणार आहे. यात दीपिका किंवा बाकी लोकांशी बरोबरी करण्याचा मुद्दा नाही मात्र मी या मुद्द्यावर शांत बसणार नाही. याशिवाय मागच्या दोन दिवसांपासून या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे दीपिकाच्या विरोधात #BoycottChhapak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे तर दुसरीकडे तिला पाठिंबा देणारा #ISuportDeepika हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. अशातच आता या सिनेमातील हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव बदलण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला असून त्या व्यक्तीची धार्मिक ओळख पुसण्याचा प्रयत्न केल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे. दीपिकाच्या ‘छपाक’मध्ये आरोपी नदीमचं नाव राजेश आहे का? वाचा काय आहे सत्य 'छपाक' हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित आहे. या सिनेमा बद्दल आता ट्विटरवर नवा वाद सुरू झाला आहे. काही युजर्सचं म्हणणं आहे की, लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन मेकर्सनी असं जाणूनबुजून केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. काही मीडिया रिपोर्टनी असा दावा केला आहे की, राजेश हे अ‍ॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव नाही आहे. पण सध्या ट्विटरवर राजेश आणि नदीम खान ही दोन्ही नावं टॉप ट्रेंडमध्ये आहेत. या नावांबाबत आतापर्यंत 1.5 लाखांपेक्षा जास्त ट्वीट करण्यात आले आहेत. मात्र हे सत्य नाही आहे. या सिनेमात अ‍ॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव बबलू उर्फ बशीर खान असं आहे. मात्र सिनेमाच्या मेकर्सनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ट्विटवर होत असलेल्या वादानंतर दीपिका आणि टीमनं या नावामध्ये बदल केल्याचं बोललं जात आहे. अ‍ॅसिड हल्ला..5 वर्षं..54 शस्त्रक्रिया.. या कारणासाठी कंगनाचा दीपिकाला पाठिंबा
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Deepika padukone

    पुढील बातम्या