अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालची TikTok वर धमाकेदार एंट्री, पाहा VIDEO

अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालची TikTok वर धमाकेदार एंट्री, पाहा VIDEO

काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेनंतर लक्ष्मी फक्त अ‍ॅसिडची खुली विक्री बंद करण्यासाठीच लढा दिला नाही तर याच काळात ती स्वतःचं जीवन मोकळेपणानं जगायलाही शिकली.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमाची ‘रिअल हिरो’ म्हणजेच खरी अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवालची कथा आता सर्वांनाच माहित झाली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेनंतर लक्ष्मी फक्त अ‍ॅसिडची खुली विक्री बंद करण्यासाठीच लढा दिला नाही तर याच काळात ती स्वतःचं जीवन मोकळेपणानं जगायलाही शिकली. कदाचित या सगळ्यामुळेच ती आज सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या याच सर्व प्रवासावर आधारित छपाक सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होत आहे.

लक्ष्मीच्या जीवनावर आधारित छपाकमध्ये दीपिका पदुकोण तिची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण सिनेमाच्या रिलीज पूर्वीच लक्ष्मी अग्रवालचे काही सुंदर टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये लक्ष्मी कधी डान्स करताना तर गाणी गाताना दिसत आहे.

लक्ष्मी अग्रावालला अनेकदा सर्वांनी कॉन्फरन्स किंवा न्यूज चॅनेलवर डिबेट करताना पाहिलं आहे. पण तिला टिक टॉकवर अशाप्रकारे मस्ती करताना पाहणं खरंच कोणत्याही सरप्राइजपेक्षा कमी नाही. हे व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला खरं पटेल की ती कशाप्रकारे तिचं जीवन बिनधास्तपणे जगते. टीक टॉकवर तिचे हे सर्व व्हिडीओ खूपच लोकप्रिय ठरले आहेत. तिचे हे व्हिडीओ तिचा मित्र नितिन सोनीनं त्याच्या टीक टॉक अकाउंटवर शेअर केले आहेत. या अकाउंटचं नाव thecurlypoet असं आहे.

लक्ष्मीचं गायिका होण्याचं स्वप्न होतं आणि ही गोष्ट तिनं अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितली आहे. यासाठी तिनं अनेक प्रयत्नही केला आहे. पाहा तिच्या गाण्याची एक झलक व्हिडीओमध्ये. तिचा आवाज खरंच खूप सुरेल आहे. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती तिचा मित्र नितिन सोनीसोबत दिसत आहे.

लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित छपाक 10 जानेवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी दीपिका पदुकोणप्रमाणेच लक्ष्मी सुद्धा खूप उत्सुक आहे. तिच्या मते हा सिनेमा तिच्यावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅक करणाऱ्यांसाठी जोरात बसलेली चपराक आहे. ज्यांनी असं करुन तिचं आयुष्य बरबाद करण्याचा विचार केला. या सिनेमात दीपिकाच्या भूमिकेच नाव मालती असं आहे.

Published by: Megha Jethe
First published: December 15, 2019, 11:57 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading