मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणातील आरोपी गहनाची तब्येत गंभीर, हार्टअटॅकनंतर फुप्फुस निकामी

पॉर्न व्हिडिओ रॅकेट प्रकरणातील आरोपी गहनाची तब्येत गंभीर, हार्टअटॅकनंतर फुप्फुस निकामी

ऑल्ट बालाजीची अडल्ट सीरिज गंदी बातमध्ये (Gandii Baat) झळकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिची प्रकृती बिघडली.

ऑल्ट बालाजीची अडल्ट सीरिज गंदी बातमध्ये (Gandii Baat) झळकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिची प्रकृती बिघडली.

ऑल्ट बालाजीची अडल्ट सीरिज गंदी बातमध्ये (Gandii Baat) झळकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिची प्रकृती बिघडली.

नवी दिल्ली, 7 जुलै: काही दिवसांपूर्वी पॉर्न फिल्म तयार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) आताच बाहेर आली आहे. तुरुंगातून आल्यानंतर अभिनेत्रीची प्रकृती खराब झाली आहे. तिला काही दिवसांपूर्वी हार्टअटॅक आला होता. आणि आताच आलेल्या बातमीनुसार अभिनेत्रीची फुप्फुसदेखील काम करणं बंद झाली आहेत.

सध्या सीबीसी पंप देऊन सुरू आहेत उपचार

अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) जेव्हा तुरुंगातून बाहेर आली होती, तेव्हाच तिची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी तिला हार्टअटॅक आला होता. ज्यानंतर तिला मुंबईतील एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. अभिनेत्रीच्या पब्लिसिस्टने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. तिला सीबीसी मशीन पंपवर ठेवण्यात आलं आहे. तिची फुप्फुसं निकामी झाली आहे. अडल्ट शो 'गंदी बात' मधील अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिची 5 महिन्यांनंतर 19 जून रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. ती तुरुंगात असताना तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र कोर्टाने वशिष्ठला जामील दिला होता. मात्र देश सोडून न जाण्याचा आदेशही दिला आहे. (Accused in porn video racket case Gehana Vasisth in critical condition lung failure after heart attack)

हे ही वाचा-दृश्यम' सिनेमा पाहून रचला कट; स्वतःवरच प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव आला अंगाशी

अनेकदा तब्येत बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिची अनेकदा तब्येत बिघडली आहे. ती diabetes ketoacidosis संबंधी आजाराने त्रस्त आहे. 2019 मधील एक वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान गहना स्ट्रोक आणि रक्तदाब कमी झाला कारणाने बेशुद्ध पडली होती. त्यावेळी तिला इलेक्ट्रिक शॉक द्यावा लाहला होता.

काय आहेत गहनावर आरोप?

गहनावर आपल्या वेबसाईटसाठी पॉर्न व्हिडिओ शूट करून अपलोड करणे, अडल्ट फिल्म मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला आहे. मिस एशिया बिकनीचा मान पटकवणारी गहना वशिष्ठनं हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. वेबसाईटवर अश्लील कंटेट अपलोड करण्याबाबत गहनाची कसून चौकशी करण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Sex, Sex racket