मुंबई, 25 डिसेंबर: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा तिच्या फिटनेससंदर्भात खूपच गंभीर आहे. हे तिच्या फिटनेसवरून लक्षात येतं. तिनं आतापर्यंत इन्स्टाग्रामवर असंख्य फोटो पोस्ट केली आहे. यामध्ये बहुतांशी फोटो जिममध्ये वर्क आऊट करतानाचे असतात. तिचा फिटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. दिशा आपल्या फिटनेसमुळं नेहमीच चर्चेत असते. दरम्यान दिशा पाटनीने बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्याचा खुलासा केला आहे.
विशेष बाब म्हणजे, या अभिनेत्रीच्या मते बॉलीवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेता टायगर श्रॉफ किंवा सलमान खान नाही, तर वेगळाच एक अभिनेता आहे. बॉलीवूडमधला सगळ्यात फिट अभिनेता कोण आहे? हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. तिला हा प्रश्न अनेकदा विचारला गेला होता. पण आता तिने याचं उत्तर दिलं आहे. तिच्या मते, बॉलीवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून फिल्म इंडस्ट्रीत गेल्या कित्येक वर्षांपासून तरुण राहिलेला अभिनेता अनिल कपूर आहे. अनिल कपूरने 24 डिसेंबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला आहे.
दिशा पटनीने अनिल कपूरसोबत 'मलंग' या चित्रपटात काम केलं आहे. या वयातही अनिल कपूर यांच्या फिटनेसमुळे ती खूपच प्रभावित झाली आहे. अनिल कपूरच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिशाने एक फोटो शेअर केला आहे, यात ती अनिल कपूरसोबत दिसली आहे. फोटो शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की- 'माझा सर्वात फिटेस्ट अभिनेता तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'
वयाच्या 64 व्या वर्षीही अनिल कपूरने स्वत: ला ज्या प्रकारे तंदुरुस्त ठेवलं आहे, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे दिशा देखील अनिल कपूरच्या फिटनेसवर फिदा आहे. असं असलं तरी केवळ दिशाच नाही तर स्वतः टायगर श्रॉफनंही अनेक वेळा अनिल कपूरच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे.